शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

अटकपूर्व जामिनावरील अंतिम सुनावणीवेळी आरोपी उपस्थित राहायला हवा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:26 PM

अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी आरोपीला उपस्थित राहणे अनिवार्य केले जाऊ शकते का, असा आदेश कोणत्या प्रकारच्या आरोपीसंदर्भात द्यायला हवा आणि अशा आदेशामुळे आरोपीचे कायदेशीर अधिकार बाधित होतात का यासह अन्य संबंधित मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ दिशादर्शक निर्णय देणार आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालय देणार निर्णय : प्रकरणावर २७ जुलै रोजी अंतिम सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी आरोपीला उपस्थित राहणे अनिवार्य केले जाऊ शकते का, असा आदेश कोणत्या प्रकारच्या आरोपीसंदर्भात द्यायला हवा आणि अशा आदेशामुळे आरोपीचे कायदेशीर अधिकार बाधित होतात का यासह अन्य संबंधित मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाचेनागपूर खंडपीठ दिशादर्शक निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी गुरुवारी या प्रकरणावर २७ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली.

मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केयर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर नारायण पालतेवार (वरिष्ठ न्यूरोसर्जन) यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून, सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी त्यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असा दावा केला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या अंतरिम संरक्षणामुळे संबंधित अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. पुढे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला. परंतु, अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी आरोपीला उपस्थित राहण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, हा पालतेवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. त्यावर सखोल सुनावणीनंतर दिशादर्शक निर्णय दिला जाणार आहे.

पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये मूळ रकमेपेक्षा कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केली, अशी तक्रार व्हीआरजी हेल्थ केयर कंपनीचे भागधारक गणेश चक्करवार यांनी सीताबर्डी पोलिसांकडे केली आहे. त्यावरून २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ५ मार्च २०२१ रोजी सत्र न्यायालयाने पालतेवार यांना त्या अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. याकरिता, चक्करवार व तपास अधिकारी यांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले होते. ते अर्ज मंजूर करण्यात आले होते.

अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी

डॉ. समीर पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर येत्या सोमवारी न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर