शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

नागपुरात जीवनरक्षक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : आशेचा किरण म्हणून ज्या मेयोकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता औषधांचा ठणठणाट असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ग्लोव्हजपासून ते जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून बाहेरून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे.राज्यातील वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळ्या दरांनी होणाऱ्या औषध खरेदीमुळे निर्माण होणारा गोंधळ ...

ठळक मुद्देमेयोच्या वाढल्या अडचणी : रुग्णांना पदरमोड करून विकत घ्यावे लागत आहे औषध

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : आशेचा किरण म्हणून ज्या मेयोकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता औषधांचा ठणठणाट असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ग्लोव्हजपासून ते जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून बाहेरून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे.राज्यातील वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळ्या दरांनी होणाऱ्या औषध खरेदीमुळे निर्माण होणारा गोंधळ व घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी ‘हाफकीन कॉर्पाेरेशन’च्या माध्यमातून सर्व औषधे व उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व शासनाचे अन्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे, तद्नुषंगिक उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणांची खरेदी आॅगस्ट २०१७ पासून हाफकीनकडून होणार होती. परंतु जानेवारी २०१८ पर्यंत खरेदी रखडली. फेब्रुवारी महिन्यापासून हाफकीनकडूनच औषधांची खरेदी होणार असल्याच्या सूचना करीत शासनाने औषधे खरेदी करण्यासाठी असलेले रुग्णालयीन स्तरावरील ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ (आरसी) संपुष्टात आणले. यामुळे कसेतरी पुरवठादाराकडून कमी जास्त प्रमाणात मिळणारी औषधेही बंद झाली. यातच आता मध्यवर्ती खरेदीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याने मेयोला औषधे खरेदीसाठी लागणारा ९० टक्के निधी संबंधित हाफकीनकडे वळता करावा लागणार आहे तर १० टक्के निधी हा स्थानिक खरेदीसाठी वापरता येणार आहे. सध्या याच निधीवर मेयोच्या औषधांचा कार्यभाग साधला जात असल्याने मोजकाच औषधांचा साठा उपलब्ध आहे.आधी ग्लोव्हज नंतरच शस्त्रक्रियामेयोमध्ये रोज किरकोळ व गंभीर स्वरुपातील अशा १५वर शस्त्रक्रिया होतात. परंतु ग्लोव्हजचा तुटवडा पडल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेआधी ग्लोव्हज आणायला सांगितले जात आहे. ग्लोव्हज आणल्यावरच शस्त्रक्रियांना हात लावला जात असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.जीवनरक्षक औषधांसाठी धावाधावरुग्णालयाच्या अतिदक्षता विभागापासून ते वॉर्डात अ‍ॅन्टीबायोटिकसह जीवनरक्षक औषधे फारच मोजक्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे ऐनवेळी रुग्णांना या औषधांसाठी धावाधाव करावी लागत आहे. सध्या रुग्णालयात सिप्रोफ्लोक्सॅसिन, मेट्रोनिडॅझोल, अ‍ॅम्पिसीलीन, जेन्टामायसिन, पेरिनॉर्म डिक्लोफेनॅक, सिफोटॉक्सिम यासारखे अनेक महत्त्वाचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.सलाईनही नाहीतमेयोमध्ये दिवसभरात विविध प्रकारच्या सुमारे पाचशेवर सलाईन लागतात. गेल्या काही महिन्यापासून सामान्य प्रकारातील सलाईनचाही तुटवडा पडला आहे. सलाईनही बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने, अनेक रुग्ण पैशांची मदत होईपर्यंत ताटकळत राहत आहे. अतिगंभीर व अपघातग्रस्त रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोडियम क्लोराईड, डेक्सट्रोस, डेक्सट्रोस नॉर्मल सलाईन आणि रिंगर लॅक्टेक सलाईनचाही मोजकाच साठा असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

टॅग्स :medicineऔषधंnagpurनागपूर