नागपुरात दिशेनुसार रविवारीही दुकाने सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:05 IST2020-06-06T22:03:50+5:302020-06-06T22:05:15+5:30
मनपाने जारी केलेल्या आदेशानुसार दिशाप्रमाणे व्यापाऱ्यांना रविवारीही दुकाने सुरू ठेवता येणार आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी लकडगंज ठाण्यात शनिवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त हुमणे आणि लकडगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी रविवारी दुकाने सुरू ठेवण्याची माहिती दिली.

नागपुरात दिशेनुसार रविवारीही दुकाने सुरू राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाने जारी केलेल्या आदेशानुसार दिशाप्रमाणे व्यापाऱ्यांना रविवारीही दुकाने सुरू ठेवता येणार आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी लकडगंज ठाण्यात शनिवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त हुमणे आणि लकडगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी रविवारी दुकाने सुरू ठेवण्याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी दुकाने लवकर बंद करावी आणि कर्मचारी रात्री ९ च्या आत घरी पोहोचले पाहिजेत.
बंद असलेल्या दुकानांच्या दिशेला दुकानदार आणि ग्राहकांनी पार्किंग करावे. दुकानात १० टक्के वा आदेशानुसार कर्मचाºयांसह शारीरिक अंतर राखून काम करावे. बैठकीत मनपाच्या लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील, पूर्व नागपूर वाहतूक विभागाचे दुबे, चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास कुकरेजा, फारुखभाई अकबानी, संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, संतोष अग्रवाल, प्रताप मोटवानी, अशोक वाधवानी, सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे, शंकर सुगंध आणि व्यापारी उपस्थित होते.