नागपुरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जुते मारो’ आंदोलन; प्रवीण दरेकर यांच्या फोटोला चपलांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 19:21 IST2021-09-14T19:20:39+5:302021-09-14T19:21:24+5:30
Nagpur News विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी दीक्षाभूमी चौकात आंदोलन करण्यात आले.

नागपुरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जुते मारो’ आंदोलन; प्रवीण दरेकर यांच्या फोटोला चपलांचा हार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी दीक्षाभूमी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी दरेकर यांच्या फोटोला चपलांचा हार घालत निषेध नोंदविण्यात आला. (‘Shoe Hit’ Movement by Women Nationalist Congress in Nagpur)
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर शहर अध्यक्ष लक्ष्मी सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश महासचिव वर्षा श्यामकुळ, सुनिता खत्री, शबाना सय्यद, सीमा चारभे आदींनी भाग घेतला. दरेकर यांनी तत्काळ राज्यासह देशातील महिलांची माफी मागावी, अन्यथा भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी सावकर यांनी दिला. आंदोलनात सोनी मंडल, मंदा मेश्राम, रजनी पाटील, सिमरन हबीब, स्वाती कुंभलकर, मुमताज अन्वर खान, मनिषा शाहू आदींनी भाग घेतला.