शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! १५ महिन्यात रेल्वे हद्दीत ५९१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:23 IST

रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ महिन्यात नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ५९१ जणांचा प्राण गेला. यात रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७६ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १४६ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना ७६जणांचा मृत्यूरेल्वेतून पडल्यामुळे १२५ हून अधिक प्रवाशांनी गमावला प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ महिन्यात नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ५९१ जणांचा प्राण गेला. यात रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७६ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १४६ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूर अंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ५९१ जणांचा मृत्यू झाला. यात खांबाला धडकल्याने ३, विजेचा धक्का लागून ९४ तर नैसर्गिक कारणांमुळे २२१ लोकांचा मृत्यू झाला. प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडल्याने २८ जणांचा जीव गेला तर २३ जणांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.२०१७ च्या तुलनेत मृत्यूची सरासरी वाढली२०१७ साली नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वेतून पडून १०२ जणांचा जीव गेला होता तर १९ जणांनी आत्महत्या केली होती. रेल्वे रुळ ओलांडणे ६० जणांच्या जीवावर बेतले होते. दर महिन्याला सरासरी ३३ जणांचा जीव गेला होता. २०१८ ते मार्च २०१९ मध्ये मृत्यूची दर महिना सरासरी ही ३९ इतकी होती.मृत्यू                                २०१७           २०१८-२०१९ (मार्चपर्यंत)रुळ ओलांडताना             ६०               ७६रेल्वेतून पडून                  १०२              १४६खांबाला धडक                 ४                  ३प्लॅटफॉर्म गॅप                  ४                   २८विजेचा धक्का                  २                  ९४आत्महत्या                       १९                २३नैसर्गिक                         २०४               २२१इतर                               ८                      -एकूण                            ४०३               ५९१

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यूRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता