धक्कादायक! संपत्तीसाठी मुलीने केला जन्मदात्रीवरच हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 20:08 IST2022-07-07T20:07:44+5:302022-07-07T20:08:50+5:30

Nagpur News माहेरच्या घराचा वाटा मिळावा यासाठी सातत्याने आग्रह करणाऱ्या मुलीने पतीच्या मदतीने स्वत:च्या आईवरच हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Shocking! The girl attacked her mother for wealth | धक्कादायक! संपत्तीसाठी मुलीने केला जन्मदात्रीवरच हल्ला

धक्कादायक! संपत्तीसाठी मुलीने केला जन्मदात्रीवरच हल्ला

ठळक मुद्देलहान भावालादेखील दिली जिवे मारण्याची धमकीजावयाचीदेखील साथ

नागपूर : माहेरच्या घराचा वाटा मिळावा यासाठी सातत्याने आग्रह करणाऱ्या मुलीने पतीच्या मदतीने स्वत:च्या आईवरच हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे गोरेवाडा परिसरात खळबळ माजली आहे.

चमेलिया राकेश गौतम यांच्या पतीचे शंकर शिवम सोसायटी, वेळाहरी येथे घर आहे. त्यांचा मुलगा प्रदीप याने स्वत:च्या कमाईतून प्लॉट खरेदी करून घर बांधले. मात्र, त्यासाठी आई-वडिलांनीच पैसे दिल्याचा संशय गौतम यांची मुलगी प्रियंका व तिचा पती राजकुमार त्रिपाठी (रा. मनीष नगर) यांना आहे. त्यामुळे ते वारंवार घराचा वाटा द्या, अशी मागणी करायचे. या मुद्द्यावरून अनेकदा त्यांनी वाददेखील घातले. काही वेळा त्यांनी माहेरच्या लोकांना मारहाणदेखील केली.

त्यामुळे कंटाळून गौतम कुटुंबीय आपल्या दोन मुलांसह गोरेवाड्यातील निर्मल नगर येथे भाड्याच्या घरात राहायला गेले. दोन दिवसांअगोदर चमेलिया गौतम या लहान मुलगा कुलदीपसह वेळाहरी येथील घरी काही सामान आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी प्रियंका व राजकुमार त्रिपाठी एका चारचाकी वाहनातून आले. प्रियंकाने परत वाद सुरू केला व पतीसह तिने आपल्या आईवरच हल्ला केला. राजकुमार त्रिपाठी त्यांना काठीने मारायला लागले. डोक्यावर प्रहार झाल्याने चमेलिया रक्तबंबाळ झाल्या. त्यानंतर प्रियंकाने आपल्या लहान भावाच्या दुचाकीचीदेखील तोडफोड केली. तुम्ही नागपुरात कुठेही राहायला गेले तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही व जिवे मारू. पोलीस आमचे काहीच बिघडवू शकत नाही, अशी धमकी त्यांनी आई व भावाला दिली.

शेजारी राहणाऱ्यांंनादेखील साक्ष न देण्यासाठी धमकी दिली. यानंतर त्याच अवस्थेत चमेलिया यांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले व मुलगी-जावयाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Shocking! The girl attacked her mother for wealth