शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
3
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
4
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
6
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
7
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
8
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
9
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
12
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
13
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
14
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
15
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
16
एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
17
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
18
Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
19
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
20
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:50 IST

मेडिकलमध्ये ४ मुले व्हेंटिलेटरवर : मध्य प्रदेशातील 'परासिया' गावातून उपचारासाठी आली १४ मुले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या औषधातून लहान मुलांना आराम मिळतो, तेच औषध जीवघेणे ठरत असल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया गावातून सर्दी-खोकल्यावरील कफ सिरप घेतल्यानंतर गंभिरावस्थेत नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झालेल्या १४ मुलांपैकी ६ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर 'एम्स' आणि काही खासगी रुग्णालयातही दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हा आकडा आठवर पोहोचला असल्याची माहिती आहे.

नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागात २६ ऑगस्ट रोजी परासिया गावातून कफ सीरपमुळे गंभीर झालेला पहिला रुग्ण दाखल झाला होता. त्यानंतर २ ऑक्टोबरपर्यंत एकूण १४ मुले भरती झाली आहेत. या सर्व बालकांचे वय दीड ते ९ वर्षांदरम्यान आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक डॉक्टरांनी या मुलांना 'कोल्ड्रिफ' नावाचे कफ सिरप दिले होते. सुरुवातीला बरे झाल्यानंतर आठवड्याभरात त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या सहाही मुलांचा मृत्यू हा किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सध्या मेडिकलच्या बालरोग विभागात सहा मुले भरती असून, त्यापैकी चार मुले व्हेंटिलेटरवर आहेत. किडनी विकारामुळे त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले.

मध्य प्रदेश एफडीएची तपासणी, औषधांवर बंदी

या गंभीर घटनेनंतर मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मेडिकलमधील बालरोग विभागाला भेट दिली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून संबंधित कफ सिरपची पाहणी करण्याचा प्रयत्न केला.औषधांच्या बॉटल सीलबंद नसल्याने ते नमुने घेऊ शकले नाहीत. मात्र, मध्य प्रदेशात या संबंधित कफ सीरपच्या बॅचेसच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप देऊ नका

कोणत्याही प्रकारचे कफ सिरप, विशेषतः कोरड्या खोकल्यासाठी दिले जाणारे सिरप, चार वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय अजिबात देऊ नका. जर मुलाला लघवी होत नसल्यास, श्वसनाचा त्रास, खूप झोप येणे किंवा फिट्स आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांनीही लहान मुलांना कफ सिरप विचारपूर्वक द्यावे आणि योग्य डोसेसचा विचार करावा.- डॉ. वसंत खळतकर, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स

English
हिंदी सारांश
Web Title : Cough syrup claims eight children's lives; cause investigated.

Web Summary : Tragedy struck as cough syrup allegedly caused kidney failure in children from Chhindwara, MP. Eight died in Nagpur hospitals. Authorities investigate the 'Coldrif' syrup, banning its sale in Madhya Pradesh. Doctors advise caution administering cough syrup to young children.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्यMadhya Pradeshमध्य प्रदेश