लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चहाची टपरी असो की, गॅरेज, हॉटेल असो की दुकान एखादा बालकामगार काम करताना निश्चितच आढळून येतो. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे, अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या तीन वर्षात त्यांनी जवळपास ३२४१ आस्थापनांना भेटी दिल्या असून त्यात केवळ ९ बालकामगार आढळून आले आहेत. यात ५ मालकाविरुद्ध न्यायालयामध्ये खटले दाखल करण्यात आले असून १५ मालकाविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही धक्कादायक माहिती दिली. नागपूर शहराचा विचार केल्यास हॉटेल, बेकरी, गॅरेज आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बाल कामगार आढळून येतात. विभागाच्या अनेक मर्यादा असल्या तरी बालकामगार राहू नये, यासाठी विभाग काम करत असतो. बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात जनजागृती अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. ७ नोव्हेंबर रोजी या अभियानाला सुरुवात झाली आहे. ७ डिसेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. उद्या २१ तारखेला मोमीनपुरा येथून सकाळी ८ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. यात ३०० ते ४०० विद्यार्थी सहभागी होतील. यानंतर कामगार कल्याण मंडळ, रघुजीनगर येथे चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यात विविध सामाजिक संघटना सहभागी होतील. २२ तारखला हसनबाग येथून जनजागृती रॅली काढण्यात येईल. यासोबतच विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सभासद उद्योगांसाठी जनजागृती कार्यक्रम तसेच पारडी नाका, मानेवाडा रोड, राणी दुर्गावती चौक, जुनी मंगळवारी, प्रतापनगर चौक या ठिकाणी पथनाट्याद्वारे बाल कामगाराच्या अनिष्ट प्रथविरुद्ध जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यवेळी समन्वयक दिनेश ठाकरे उपस्थित होते.बालकामगार प्रथेविरुद्ध कारवाई व्हावीचबालकामगार ही अनिष्ट प्रथा आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण सांगता येणार नाही. कुठेही बालकामगार आढळून येणार नाही, यासाठी सर्वांनाच काम करावे लागेल. आम्हा सर्वांचीच ती जबाबदारी आहे.रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी
धक्कादायक वास्तव : नागपुरात तीन वर्षात आढळले केवळ ९ बालकामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:02 IST
अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या तीन वर्षात त्यांनी जवळपास ३२४१ आस्थापनांना भेटी दिल्या असून त्यात केवळ ९ बालकामगार आढळून आले आहेत.
धक्कादायक वास्तव : नागपुरात तीन वर्षात आढळले केवळ ९ बालकामगार
ठळक मुद्देबाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान