शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

धक्कादायक : मृत बहीण-भावाच्या खात्यात जमा होते ३६ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:07 IST

संशयास्पद अवस्थेत श्वानासह घरात मृतावस्थेत सापडलेले भाऊबहिण आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. भाऊ मोहनलाल ओटवानीच्या पोस्ट खात्यात ३५ लाख रुपये जमा होते तर बहीण शांता ओटवानी यांच्या एसबीआयच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा होते. बचत खात्यात लाखो रुपये जमा असूनही ते दयनीय अवस्थेत राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान ३० तास उलटल्यानंतरही दोघांच्या कुठल्याही नातेवाईकाचा पत्ता लागलेला नाही.

ठळक मुद्दे३० तासानंतरही सापडला नाही नातेवाईकभूक आणि तहानेने मृत्यू झाल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संशयास्पद अवस्थेत श्वानासह घरात मृतावस्थेत सापडलेले भाऊबहिण आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. भाऊ मोहनलाल ओटवानीच्या पोस्ट खात्यात ३५ लाख रुपये जमा होते तर बहीण शांता ओटवानी यांच्या एसबीआयच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा होते. बचत खात्यात लाखो रुपये जमा असूनही ते दयनीय अवस्थेत राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान ३० तास उलटल्यानंतरही दोघांच्या कुठल्याही नातेवाईकाचा पत्ता लागलेला नाही.८० वर्षीय मोहनलाल आणि त्यांची ७५ वर्षीय बहीण शांता १५ जानेवारी रोजी दुपारी आपल्या घरात पाळीव श्वानासह मृतावस्थेत आढळून आले. तिघांच्याही मृत्यूचे कुठलेही कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मोहनलाल आणि त्याच्या बहिणीची परिसरातील कुणाशीही बोलचाल नव्हती. त्यांच्या घरी कुणी येत-जातही नव्हते. दोघेही पाळीव श्वानासह एकाकी जीवन जगत होते. त्यांचे घर तात्या टोपेनगरातील मुख्य रस्त्यावर आहे. त्याची किंमतच कोट्यवधी रुपये आहे. त्यांचे घरही बाहेरून जीर्ण झालेले वाटत होते. घराला प्लास्टरही झाले नाही. घर आणि स्वयंपाक खोलीतील अवस्था पाहता घरात अनेक दिवसांपासून जेवणच बनले नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तिघांचाही मृत्यू भुकेने झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.बजाजनगर पोलीस घटनेपासूनच त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. त्यांच्या घरातून तीन मोबाईल सापडले. दोन मोबाईल कुठल्याही कामाचे नाहीत. एका मोबाईलच्या कॉल लिस्टमध्ये १० नंबर सापडले आहे. पोलिसांनी सर्वच नंबरवर संपर्क केला. ते नंबर सिलिंडर देणारे, दूध देणारे, मीटर रिंडींग कर्मचारी आणि इतर वस्तू आणून देणाऱ्यांचे आहेत. त्या सर्वांनीच त्यांच्या कुठल्याही नातेवाईकांची माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी खामला आणि जरीपटका परिसरातील काही कुटुंबांशीही संपर्क केला. पोलिसांना घरातून डाक विभागाचे बुक आणि एसबीआयचे पासबुक सापडले. यात मोहनलालने पोस्ट खात्यात ३५ लाख रुपयाची एफडी केल्याचे आढळून आले तर एसबीआयच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये आहेत. दोघांनीही आपापल्या खात्यात एकमेकांना वारसदार म्हणून सांगितले आहे.३६ लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यात असुनही दोघेही दयनीय जीवन जगत असल्याने पोलीसही आश्चर्य व्यक्त करीत आहे. आतापर्यंतच्या तपासात मोहनललाचा मृत्यू आधी झाल्याचा संशय आहे. मोहनलालच्या मृत्युने शांताही बेशुद्ध झाल्याचा संशय आहे. तिने घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असावा. कारण तिचा मृतदेह दरवाजाजवळ सापडला. मोहनलालचे पाय आणि हातावर ओरबाडल्याचा खुना आहेत. श्वानाने ओरबाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरात कुठलही संशयास्पद वस्तू सापडली नाी. त्यामुळे दोघांनीही श्वानासह भुकेने जीव सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.श्वानाचाही केला पोस्टमार्टमपोलिसांनी भाऊ-बहिणीसह त्यांचा पाळीव श्वानाचेही पोस्टमार्टम करायला लावले. दोघांचे मेडिकलमध्ये तर श्वानाचे वेटरनरी कॉलेजमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. श्वानाच्या पोटात अन्नाचा एक कणही आढळून आला नाही. हीच अवस्था भाऊबहिणीची होती. त्यामुळे भुकेने त्यांचा मृत्यू झाल्याच्या शंकेला अधिक बळ मिळते.भांडेवाडीत पाठवला जिवीत श्वानपोलिसांना मृत श्वानासह एक जिवंत श्वानही घरात सापडले. पोलिसांनी त्याला जेवण देऊन घराबाहेर करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्याला पकडून भांडेवाडी येथील श्वान केंद्रात पाठवण्यात आले. शांताला श्वान खूप आवडायचे. ती काही दिवसांपूर्वीपर्यंत परिसरातील बेवारस श्वानांना दूध पाजायची. तिला पाहताच श्वान धावत यायचे. हे श्वान कुणालाही तिच्या घरात जाऊ देत नव्हते.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर