योगेश पांडे
नागपूर : रील्स आणि विविध सोशल माध्यमांतून लहान मुलांवर नको त्या गोष्टींचा प्रचंड भडीमार होत आहे. त्यातूनच अनेकदा लैंगिक विकृती बळावतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरातून समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्याहून लहान असलेल्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आरोपी मुलगा हा १६ वर्षांचा आहे. तर, पिडीत मुलांचे वय अनुक्रमे ८ व १२ वर्ष इतके आहे. पिडीत मुलांचे आईवडील कामगार असून, ते कामाला निघून जातात. मात्र, आईवडील कामावर गेल्यावर मुले घरी एकटेच असतात. आरोपी मुलगा हा त्यांच्या परिचयाचाच होता. त्याने काही दिवसांअगोदर दोन्ही मुलांना धाक दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. आरोपीने भिती दाखविल्याने पिडीत मुलांनी कुणालाच काही सांगितले नाही.
मात्र, त्यानंतर आरोपीची हिंमत वाढली व त्याने रविवारी दुपारी त्यांच्यावर अत्याचार केला. सायंकाळी पिडीत मुलांचे पालक घरी आले. त्यावेळी एका मुलाला वेदना होत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी मुलाला काय झाले हे विश्वासात घेऊन विचारले असता हा प्रकार त्याने सांगितला. पालकांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पोलिसांनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली. अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची रवानगी बालसुधारगृहात केली. आरोपीविरोधात ॲट्रोसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
Web Summary : A 16-year-old in Nagpur sexually assaulted two younger boys, aged 8 and 12. The accused, familiar to the victims, threatened them into silence. After a recent assault, the victims disclosed the abuse to their parents, who reported it to the police. The accused is now in juvenile detention.
Web Summary : नागपुर में 16 वर्षीय लड़के ने 8 और 12 साल के दो छोटे लड़कों का यौन उत्पीड़न किया। आरोपी, पीड़ितों का परिचित था, उसने उन्हें चुप रहने की धमकी दी। हाल ही में हमले के बाद, पीड़ितों ने अपने माता-पिता को शोषण के बारे में बताया, जिन्होंने पुलिस को सूचना दी। आरोपी अब किशोर हिरासत में है।