शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धक्कादायक ! नागपुरात १० दिवसात १०१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:26 PM

नागपूर जिल्ह्यात कोरोनाने घेतलेला पहिला बळी ४ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुषाचा होता. २९ एप्रिल रोजी मोमीनपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढतच गेला. मे महिन्यात ९, जून महिन्यात १४, जुलै महिन्यात १०१ तर गेल्या तीन दिवसात ४६ मृतांची नोंद झाली. विशेष म्हणजे २६ जुलै ते ३ आॅगस्ट या १० दिवसात १०१ मृत्यू झाले आहेत.

ठळक मुद्दे ‘को-मॉर्बिडिटी’ ठरतेय प्राथमिक कारण : गंभीर झाल्यावरच रुग्ण रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने घेतलेला पहिला बळी ४ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुषाचा होता. २९ एप्रिल रोजी मोमीनपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढतच गेला. मे महिन्यात ९, जून महिन्यात १४, जुलै महिन्यात १०१ तर गेल्या तीन दिवसात ४६ मृतांची नोंद झाली. विशेष म्हणजे २६ जुलै ते ३ आॅगस्ट या १० दिवसात १०१ मृत्यू झाले आहेत. मृतांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. प्राथमिक अहवालानुसार, ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच ज्या लोकांना दीर्घकाळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय आहे अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होत नाही. जिल्ह्यात ३ आॅगस्टपर्यंत ६,१४३ रुग्ण बाधित झाले असून, यातील ६१.११ टक्के म्हणजे ३,७५४ रुग्ण बरे झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण २.७९ टक्के आहे. १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १० दिवसातील मृतांमध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. राज्यातील हा सर्वात कमी वयाचा मुलगा होता. त्याला ‘क्वॉड्री पॅरालिसीसी’ हा जुनाट आजार होता. उर्वरित मृत २० ते ८५ वयोगटातील आहेत. यात २० व २५ वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. यात २० वर्षीय गर्भवतीचा रक्तदाब वाढल्याने झटके येत होते. हे झटके एका मागून येत असल्याने प्रसुती करून झटक्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिचा मृत्यू झाला. दुसरी २५ वर्षीय महिला आठ महिन्याची गर्भवती होती. कोविडच्या संसर्गामुळे तिचे दोन्ही फुफ्फुस खराब झाले होते. याच दरम्यान तिची नॉर्मल प्रसुती झाली. परंतु दोन दिवसात तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोविडच्या गंभीर संसर्गामुळे झाला असावा, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. चाळिशीच्या आतील चार रुग्णांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गासोबतच उच्च रक्तदाब, हृदयाचा विकार व लठ्ठपणा यामुळे झाल्याचे प्राथमिक अहवालातून दिसून येते. उर्वरित मृतांमध्ये अनियंत्रित व जुनाट मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, श्वसनाचा आजार, मूत्रपिंड व यकृताचा आजार असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञानुसार ज्यांना जुने आजार आहेत व ते अनियंत्रित आहेत त्यांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.४० ते ६० वयोगटात मृतांचे प्रमाण जास्तगेल्या १० दिवसात ४० ते ६० या वयोगटात मृतांचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञानुसार, याच वयात बहुतांश लोकांना उच्चरक्तदाब आणि मधुमेह यासारखे आजार होतात. या वयात कुटुंबाची अधिक जबाबदारी त्यांच्यावर राहत असल्याने या आजाराकडे दुर्लक्ष होते. शिवाय, इतर लोकांच्या अधिक संपर्कात येत असल्यामुळे विषाणूंच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त संभवतो.केवळ कोविडमुळे मृत्यूचे प्रमाण कमीतज्ज्ञानुसार, केवळ कोविडमुळेच होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. सर्वच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे म्हणजे फुफ्फुसाला झालेल्या इन्फेक्शनमुळे होत नाही. सुरुवात तिथून होते आणि मग इतर गुंतागुंत वाढून जीव जातो.छोट्याशा छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नकाछोट्याशा छोट्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार न घेतल्याने मृतांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, ताप, सर्दी, खोकला व इतरही लक्षणे असलेल्यांनी स्वत:हून औषध घेऊ नये. औषध घेतल्याने बरे झालेले काही रुग्ण पाच ते सात दिवसानंतर अचानक अस्वस्थ होऊन रुग्णालयात येत आहेत. यातील काही रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येत असून, २४ ते ४८ तासात त्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविडची तपासणी करून घ्या, शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासून घ्या.डॉ. राजेश गोसावी विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर