नागपूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवानी दानी यांची निवड

By गणेश हुड | Updated: March 2, 2026 16:45 IST2026-03-02T16:02:53+5:302026-03-02T16:45:08+5:30

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या नगरसेविका शिवानी दानी यांची आज सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

Shivani Dani elected as Nagpur Municipal Corporation Standing Committee Chairperson | नागपूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवानी दानी यांची निवड

Shivani Dani elected as Nagpur Municipal Corporation Standing Committee Chairperson

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या नगरसेविका शिवानी दानी यांची आज सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज  दाखल करण्यात आला नाही. शिवानी दानी यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने  निवडणूक निर्णय अधिकारी  जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी त्यांची बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली.

स्थायी समितीत सत्ताधारी भाजपचे ११ सदस्य असून काँग्रेसचे चार तर मुस्लिम लीगचा एक असे एकूण १६ सदस्य आहेत. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने काँग्रेसने उमेदवार दिला नाही. समिती सभापती पदासाठी भाजपने आधीच शिवानी दानी यांच्या नावाची घोषणा केली होती.

स्थायी समिती ही महानगरपालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. त्यामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले होते.

Web Title : शिवानी दानी नागपुर महानगरपालिका स्थायी समिति की सभापति निर्वाचित

Web Summary : भाजपा की शिवानी दानी सर्वसम्मति से नागपुर महानगरपालिका स्थायी समिति की सभापति निर्वाचित हुईं। कांग्रेस पार्टी ने नामांकन दाखिल नहीं किया, जिससे दानी की निर्विरोध जीत हुई। स्थायी समिति वित्तीय और प्रशासनिक निर्णयों के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Shivani Dani Elected Nagpur Municipal Corporation Standing Committee Chairperson

Web Summary : BJP's Shivani Dani was unanimously elected as the Nagpur Municipal Corporation Standing Committee Chairperson. The Congress party did not file a nomination, leading to Dani's unopposed victory. The Standing Committee is crucial for financial and administrative decisions.

टॅग्स :nagpurनागपूर