ठिकठिकाणी शिवजंयीत साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:23 IST2021-02-20T04:23:05+5:302021-02-20T04:23:05+5:30
- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी गेट, महाल येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून ...

ठिकठिकाणी शिवजंयीत साजरी
- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी गेट, महाल येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रधान महासचिव गजराज हटेवार, दयाल जशनानी, संजय महाकाळकर, बंटी शेळके, प्रा.दिनेश बानाबाकोडे, महेश श्रीवास, प्रा.मनोहर तांबुलकर, अशोक निखाडे, दिनेश तराळे, पंकज निघोट, मोतीराम मोहाडीकर, पंकज थोरात, ज्ञानेश्वर ठाकरे, अब्दुल शकील, गोपाल पटटम, युवराज वैद्य, ईरशाद मलीक, किशोर गजभिये, विश्वेश्वर अहिरकर, प्रशांत ढाकने, आकाश तायवाडे, वैभव काळे, अजय नासरे, मनीष उमरेडकर, बॉबी दहीवले, महेश भोयर, ओबीसी अध्यक्ष चंद्रकांत बडगे, राजाभाऊ चिलाटे, राकेश वैद्य, हरीचंद फुलवानी, भारत जशनानी यांसहीत मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे नागपूर येथील दीक्षाभूमी मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित समाज कल्याण निरीक्षक अजय भडंगे, माहिती तंत्रज्ञान सल्लागार वैभव पोतनूरवार व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.