‘मिंधे’ गटाची नजरच बुभुक्षित, यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 06:14 IST2022-12-30T06:13:57+5:302022-12-30T06:14:51+5:30

सरसंघचालक भागवतांनी काळजी घ्यावी, कोणत्या कोपऱ्यात लिंबू, टाचण्या पडल्या आहेत का, याचा शोध घ्यावा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

shiv sena thackeray group chief uddhav thackeray criticised shinde group after eknath shinde visit rss headquarters | ‘मिंधे’ गटाची नजरच बुभुक्षित, यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले: उद्धव ठाकरे

‘मिंधे’ गटाची नजरच बुभुक्षित, यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले: उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिंदे गटाने मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, तर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. संघ कार्यालयातून ते बाहेर पडले असतील तर सरसंघचालक भागवतांनी काळजी घ्यावी, कोणत्या कोपऱ्यात लिंबू, टाचण्या पडल्या आहेत का, याचा शोध घ्यावा. कारण या मिंधे गटाची नजर बुभुक्षित आहे. यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषदेत लगावला.

ठाकरेंच्या स्मृतीत फरक पडला : बावनकुळे

सरडासुद्धा वेळेनुसार रंग बदलतो; परंतु उद्धव ठाकरे त्याहीपुढे गेले आहेत. सत्ता गेल्यापासून त्यांच्या स्मृतीत फरक पडला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर केली. ठाकरे यांनीच संघामध्ये माणूस कसा घडतो याबद्दल भाष्य केले होते, असेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group chief uddhav thackeray criticised shinde group after eknath shinde visit rss headquarters