'ती' कामानिमित्त घराबाहेर गेली; इकडे चोरट्यांनी १.६१ लाखांचा मुद्देमाल पळवला
By दयानंद पाईकराव | Updated: September 29, 2023 13:52 IST2023-09-29T13:46:30+5:302023-09-29T13:52:46+5:30
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

'ती' कामानिमित्त घराबाहेर गेली; इकडे चोरट्यांनी १.६१ लाखांचा मुद्देमाल पळवला
नागपूर : दार उघडे ठेऊन शिलाई करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरातील १.६१ लाखांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११.१५ ते ११.४५ दरम्यान घडली. अतिया परवीन मो. सलीम (वय ४३, रा. अमन प्रेस्टीज संजीवा बेकरीच्या बाजुला अवस्थीनगर) या आपल्या घराचे दार उघडे ठेऊन शिलाई मशिनवर शिलाई करण्यासाठी जाफरनगर येथे गेल्या होत्या.
अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ६ हजार असा एकुण १.६१ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.