शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐ मौत ठहर जा... अभी तैयार मैं नही...! पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 'ती' बिहारमधून पोहचली

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2023 22:05 IST

काळाचा सूड त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनीही अनुभवला. काळजाला चिरे पडावे, अशी ही कर्मकथा रामसेवक भूईया (वय ३८) या बिहारातील मजूर आणि त्याच्या कुटुंबासंबंधाची आहे.

नागपूर : इस जिंदगी का मै तलबगार तो नही, ऐ मौत ठहर जा...ऐ मौत ठहर जा... अभी तैयार मैं नही!...काळ, मृत्यू खूपच क्रूर असतो. कुणाच्या कितीही अडचणी असू दे, कुणी त्याच्यासमोर कितीही आर्जव करू दे, तो ऐकत नाही. गरिबीच्या दाहकतेचे चटके भोगणाऱ्या आणि बायको-मुलांच्या विरहाने कासाविस होऊन आपल्या गावाकडे निघालेल्या एका मजुरानेही उपरोक्त दोन ओळीच्या आशयातून मृत्यूला साद घालण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र मृत्यूने त्याला दाद दिली नाही. या मजुरावर रस्त्यातच झडप घातली. काळाचा सूड त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनीही अनुभवला. काळजाला चिरे पडावे, अशी ही कर्मकथा रामसेवक भूईया (वय ३८) या बिहारातील मजूर आणि त्याच्या कुटुंबासंबंधाची आहे.

औरंगाबाद (बिहार) जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात रामसेवक राहत होता. पत्नी बसंतीने त्याचा संसार फुलवला. त्यांना पाच मुले आहेत. गावात वर्षातील काही दिवसच हाताला काम, तेही रात्रंदिवस कष्ट करून धड दोन वेळेची चुल पेटविण्यास पुरेसे नव्हते. चेन्नई, कर्नाटकमध्ये खूप काम आणि चांगले पैसे मिळते, असे रामसेवकने कुणाकडून तरी ऐकले. त्यामुळे काळजाचे तुकडे आणि पत्नीला गावात ठेवून २ हजार किलोमिटर दूर कर्नाटकमध्ये पोहचला. तेथे मिळेल ते कष्ट करून स्वत:चे पोट भरायचे अन् जागा मिळेल तेथे झोपायचे, असे त्याचे सुरू झाले. मात्र, बरेच दिवस कबाडकष्ट करून तेथेही गाठी पैसे पडत नव्हते. 

पत्नी आणि मुलांच्या विरहात जीवही कासाविस होत होता. त्यामुळे रामसेवकने गेल्या आठवड्यात आपल्या गावात पोहचण्यासाठी रेल्वे तिकिटाचे जेवढे भाडे आहे, त्याची सोय केली अन् बायको-मुलांत पोहचण्यासाठी बुधवारी बेंगळुरू दानापूर संघमित्रा एक्सप्रेसमध्ये बसला. त्याच्या जवळ ना बॅग होती ना, खिशात पैसा. अंगावरच्या कपड्यांसह बायको-मुलांच्या ओढीने त्याने गावाकडचा प्रवास सुरू केला. ११८० किलोमिटरचे अंतर पूर्ण करून गुरुवारी सकाळी ट्रेन नागपुरात पोहचली. 

येथे प्रवाशांनी तक्रार केल्याने आरपीएफ आणि जीआरपीने ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा उघडला. आतमध्ये रामसेवक मृतावस्थेत आढळला. त्याच्या कपड्याच्या खिशात आढळलेल्या तिकिट आणि आधारकार्डमुळे त्याची ओळख पटली अन् रेल्वे पोलिसांनी लगेच बिहार पोलिसांच्या माध्यमातून रामसेवकच्या गावातील मुखियाशी संपर्क केला. त्यांना रामसेवकचा मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबियांना नागपुरात येण्याची सूचना केली.

रामसेवकचे कुटुंबीय अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करणारे. त्यामुळे एवढे अंतर कापण्यासाठी ते कुठून पैसे आणणार, असा प्रश्न उपस्थित झाला. ठाणेदार मनिषा काशिद यांनी पोलिसांमार्फत त्यांना कळविले की 'त्यांना तेथून रेल्वेने नागपुरात पाठविण्याची व्यवस्था तुम्ही करा, ईकडून गावात पाठविण्याची व्यवस्था आम्ही करतो'. हा आधार मिळाला अन् रामेसवकची पत्नी बसंती, छोटा मुलगा आणि जवळचे नातेवाईक असे पाच जण रविवारी नागपुरात पोहचले. रामसेवकचा मृतदेह पाहून पत्नी धायमोकलून रडली. 

कळण्या-समजण्याचे वय नसल्याने मुलगा कावराबावरा झाला. मृतदेह गावात न्यायचा म्हटले तर ३० ते ३५ हजार रुपये खर्च येणार होता. जीवंतपणी पै-पैशासाठी रक्ताचा घाम करणाऱ्या रामसेवकला हजाराचा आकडाच कळला नाही. त्याच्या भाबड्या पत्नीने तर तीस पस्तीस हजारांची कल्पनाच केली नसावी. त्यामुळे रामसेवकवर येथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यानुसार, रखरखत्या उन्हात अनवानी तगमग करत रामसेवकची पत्नी, नातेवाईक यांनी येथील गंगाबाई घाटावर रामसेवकवर अंत्यसंस्कार केले.

बसंतीचे रुदन हृदयातच गप्पजीवंतपणी रामसेवकने प्रचंड आर्थिक झळ सोसली. मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनीही आर्थिक परिस्थितीची दाहकता अनुभवली. चार पैसे घेऊन येईन, बायको मुलांना पोटभर खाऊ घालेन, ही आस बाळगून गावापासून दोन हजार किलोमिटर दूर गेलेल्या रामसेवकला तेथेही गरिबीने, पोटाच्या आगीने चटके दिले. ते असह्य झाल्याने त्याने गावाकडचा रस्ता धरला मात्र त्याचा प्रवास अर्ध्यावरच संपला. तो कायमचा थांबला. त्याच्या जाण्याने पत्नी बसंतीचे रुदन हृदयातच गप्प झाले.

अश्रू अन् भरलेल्या भावनारामसेवकचा मृतदेह ताब्यात घेण्यापासून तो त्याच्या पत्नी-मुलासह अन्य कुटुंबीयांना नागपुरात बोलवून रामसेवकवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत अन् त्यांच्या खानपानासह खर्चासाठी आर्थिक मदत करून अत्यंत प्रशंसनीय काम रेल्वेच्या ठाणेदार मनीषा काशिद, एएसआय झुरमुरे, हवलदार नीलेश बारड, हवलदार पटले आणि ऋषी राखुंडे तसेच वाहन चालक संतोष महानंदीया यांनी केले. या सर्वांना मनोमन धन्यवाद देत सुकलेले अश्रू अन् भरलेल्या भावना सोबत घेत बसंती रामसेवकच्या अस्थी घेऊन गावाकडे निघाली.

टॅग्स :nagpurनागपूर