भावासोबत मोबाईलवरून झाला वाद आणि संतापाच्या भरात तिने केले ‘हे’ कृत्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:52 IST2020-07-13T11:51:57+5:302020-07-13T11:52:31+5:30
शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास तिचा तिच्या भावासोबत मोबाईलवरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात साक्षीने घरातील कीटकनाशक प्राशन केले.

भावासोबत मोबाईलवरून झाला वाद आणि संतापाच्या भरात तिने केले ‘हे’ कृत्य...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावासोबत मोबाईलवरून वाद झाल्यामुळे रागाच्या भरात एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय १९) असे तिचे नाव असून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.
श्याम नगरातील रहिवासी असलेली साक्षी ही बिंझाणी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास तिचा तिच्या भावासोबत मोबाईलवरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात साक्षीने घरातील कीटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडाला फेस आल्याचे पाहून घरच्यांनी लगेच दिला बाजूच्या खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी मेयोत नेण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री ८.५० च्या सुमारास डॉक्टरांनी साक्षीला मृत घोषित केले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून साक्षीच्या आत्महत्या मागचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी केली. त्यातून भावासोबत मोबाईलवरून वाद झाल्याने ही घटना घडल्याचे उघड झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.