शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पूल दहा दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 9:25 PM

महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या रिच-२ कॉरिडोर अंतर्गत व्हेरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे कार्य सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे.

ठळक मुद्दे ‘स्टील गर्डर ब्रिज’ कार्याला सोमवारपासून प्रारंभ : मेट्रो रेल्वे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोनागपूर प्रकल्पाच्या रिच-२ कॉरिडोर अंतर्गत व्हेरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे कार्य सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे.जमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर मेट्रोच्या दोन पिलरवर एकूण ४०० मीटर लांबीच्या स्पॅनसाठी होणाऱ्या या कार्यासाठी ४०० आणि २२० मेट्रिक टन क्षमतेच्या २ क्रेनचा वापर होणार आहे. कार्य होत असताना सतत जड लोखंडी साहित्याचा वापर होणार असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागातर्फे कार्य पूर्ण होईपर्यंत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल अस्थायी स्वरुपात बंद करण्यात आला आहे. संबंधित अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.उड्डाण पूल बंद राहणार असल्याने मॉरिस कॉलेज टी- पॉईंट  ते रहाटे कॉलनी चौकापर्यंत आवागमन करण्यासाठी वाहनचालकांनी उड्डाण पुलाखालचा मुख्य रस्ता अथवा अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. वाहनचालकांच्या सहकार्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॉफिक मार्शल आणि जलद कृती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक विभागाचे अधिकारी कार्यरत असतील.व्हेरायटी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक, विविध प्रतिष्ठाने, मॉल, शॉपिंग स्ट्रीट (मेन रोड) आणि सिटी बस स्टॉप असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे याठिकाणी कार्य करणे एक प्रमुख आव्हान महामेट्रोपुढे आहे. वाहनचालकांना लवकर आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल पूर्ववत उपलब्ध करून देण्यासाठी याठिकाणी दिवसरात्र कार्य करून महामेट्रो १० दिवसातच कार्य पूर्ण करेल. संपूर्ण कार्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात येईल. कार्य पूर्ण होत असताना सुरक्षेची संपूर्ण जवाबदारी स्वीकारत सुरक्षा अधिकारी कार्यस्थळी उपस्थित असतील.शहरात प्रकल्पाचे कार्य होत असतांना नागपूरकरांनी नेहमीच महामेट्रोला सहकार्य केले आहे. छत्रपती उड्डाण पूल जमीनदोस्त करतानादेखील महामेट्रोच्या कार्याची जाणीव नागरिकांना होती. तेव्हा आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावरील हे कार्यदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी उड्डाण पूल बंद असणार याची जाणीव ठेवत मेट्रो प्रकल्पाच्या कार्यसाठी नागरिक सहकार्य करतील, अशी अपेक्षा महामेट्रोतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर