घराच्या गच्चीवर झोपलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 22:40 IST2022-04-13T22:40:19+5:302022-04-13T22:40:43+5:30
Nagpur News आराेपीने घराच्या गच्चीवर झाेपून असलेल्या तरुणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.

घराच्या गच्चीवर झोपलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; आराेपीस अटक
नागपूर : आराेपीने घराच्या गच्चीवर झाेपून असलेल्या तरुणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्यांतर्गत साेमवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास घडली.
नरेश जगत खाेजरे (३४, रा.किराड वाॅर्ड क्र. ५, मनसर, ता.रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. ३२ वर्षीय पीडित तरुणी ही घराच्या गच्चीवर झाेपून असताना, आराेपीने तिथे येऊन तिचे ताेंड दाबून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडितेची मानलेली बहीण उठली असता, आराेपीने तेथून पळ काढला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशा भुते करीत आहेत.