शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दाेघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 16:07 IST

पाटबंधारे विभागाच्या पडक्या झोपडीत घृणास्पद कृत्य

उमरेड (नागपूर) : लग्नाचे आमिष दाखवित बळजबरीने दुचाकीवर बसवून हेवती शिवारातील पाटबंधारे विभागाच्या पडक्या झोपडीत नेत आराेपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी दाेन आराेपींविरुद्ध पाेक्साे अन्वये गुन्हा दाखल करून आराेपींना अटक केली आहे.

मोहन मोरेश्वर मांढरे (वय ३२) व पंकज अशोक उके (३५, दाेघेही रा. ठाणा) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. पीडित १६ वर्षीय मुलगी काही दिवसांपूर्वी माेबाईलच्या माध्यमातून मुख्य आराेपी माेहन मांढरे याच्या संपर्कात आली हाेती. दाेघांच्याही आणाभाका सुरू झाल्या. सातत्याने मोबाईलवर संवाद सुरू होता. अशातच मंगळवारी (दि. १) आरोपीने पीडितेला भेटण्याकरिता बोलावले. फिरायला जाऊ, दोघेही लग्न करू, अशी बतावणी आराेपीने तिला केली. मात्र, मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले.

अशातच रात्री ८ वाजताच्या सुमारास पीडितेच्या घराजवळील रस्त्यावरून तिला बळजबरीने दुचाकी वाहनावर बसवून नेले. यावेळी दुसरा आरोपी पंकज उके हासुद्धा सहभागी होता. त्यानंतर आरोपीने हेवती शिवारातील पाटबंधारे विभागाच्या पडक्या झोपडीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६, ३४, पोस्को अन्वये गुन्हा दाखल करून आराेपींना अटक केली. दरम्यान, पाेलिसांनी दोन्ही आरोपींना उमरेड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मकरधोकडा मार्गावर पकडले

आरोपीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेला दुचाकीने मकरधोकडा मार्गाने नेले. दुसरीकडे आप्तस्वकीय आणि गावकरी मुलीचा शोध घेत होते. अशातच मकरधोकडा शिवारात दुचाकीवर तिघेही आढळून आले. गावकऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. लागलीच पाेलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणumred-acउमरेड