वाठोड्यात स्पाच्या आड सेक्स रॅकेट, दोन महिलांना अटक
By योगेश पांडे | Updated: June 3, 2024 17:55 IST2024-06-03T17:55:08+5:302024-06-03T17:55:49+5:30
Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली कारवाई

Sex racket under the cover of spa in Wathoda, two women arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन सूत्रधार महिलांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
जय जलाराम नगर येथे एक्झोटिक स्पामध्ये देहव्यापार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याची खातरजमा केली व डमी ग्राहकाच्या माध्यमातून सौदा केला. त्याने इशारा दिल्यावर २ जून रोजी दुपारच्या सुमारास धाड टाकली. तेथे तीन पिडीत तरूणी आढळल्या. सारिका (३७) व रोहिणी (३२) या दोन महिला या अड्ड्याच्या सूत्रधार होत्या. त्यांच्या ताब्यातून ४ मोबाईल फोन, रोख अडीच हजार जप्त करण्यात आले. दोन्ही सूत्रधार महिलांविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, सचिन बडिये, शेषराव राऊत, आरती चव्हाण, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितीन वासने, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.