नागपुरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2023 06:09 PM2023-02-08T18:09:24+5:302023-02-08T18:10:07+5:30

Nagpur News नरेंद्रनगरातील एका देहव्यापाराच्या रॅकेटचा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे.

Sex racket busted in a hotel in Nagpur | नागपुरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड

नागपुरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड

googlenewsNext

नागपूर : नरेंद्रनगरातील एका देहव्यापाराच्या रॅकेटचा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे. या प्रकरणात आरोपी नीरज गणेश ठेबरे (२६, भीमनगर, रामेश्वरी) याला अटक केली असून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

नरेंद्रनगरातील श्रद्धा इन हॉटेल येथे आरोपीकडून मुली पुरविल्या जात असल्याची टीप गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी डमी ग्राहक तेथे पाठविला. संबंधित ग्राहकाने सौदा केला व तो हॉटेलमध्ये केला. त्याने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेथे दोन मुली देहव्यापार करताना आढळून आल्या. आरोपी नीरज हा त्यांच्या आर्थिक स्थितीचा फायदा उचलत पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचा. दोन्ही मुलींची पोलिसांनी सुटका केली, तर नीरजविरोधात बेलतरोडी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त मुमक्का सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे, रिना जाऊरकर, भूषण झाडे, संदीप चंगोले, राशीद शेख, मनिष रामटेके, अश्विन भांगे, सुधीर तिवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sex racket busted in a hotel in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.