नागपुरातील इमामवाड्यातील सात वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:59 IST2019-10-24T19:57:47+5:302019-10-24T19:59:11+5:30

इमामवाड्यात एका नराधमाने सात वर्षीय चिमुकलीवर तर मानकापुरात एका फेसबुक फ्रेण्डने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

Seven-year-old girl raped in Imamwada in Nagpur | नागपुरातील इमामवाड्यातील सात वर्षीय मुलीवर बलात्कार

नागपुरातील इमामवाड्यातील सात वर्षीय मुलीवर बलात्कार

ठळक मुद्देमानकापुरात फेसबुक फ्रेण्डने केला बलात्कार : दोन्ही प्रकरणात पोक्सोनुसार गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाड्यात एका नराधमाने सात वर्षीय चिमुकलीवर तर मानकापुरात एका फेसबुक फ्रेण्डने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.
इमामवाड्यातील आरोपीचे नाव रामदास पुनवू सेंदरे (वय ५५) असे आहे. वस्तीत राहणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीला त्याने बुधवारी सकाळी ११ वाजता पैशाचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले आणि तेथे तिच्यावर पाशवी बलात्कार केला. घरी येऊन मुलीने आपल्या पालकांना माहिती दिली. ती शेजाऱ्यांना कळताच परिसरात संताप निर्माण झाला. अनेकांनी आरोपीकडे धाव घेतली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
मानकापुरातील आरोपी केवळ १७ वर्षांचा आहे. त्याची फेसबुकवरून एका १६ वर्षीय मुलीसोबत २०१७ मध्ये ओळख झाली. ती मैत्री आणि प्रेमात रूपांतरीत झाली. उन्हाळ्याच्या सुटीत १ मे ते ५ मे २०१७ दरम्यान आरोपी मित्राने तिच्या घरी जाऊन ती एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाला आता दोन वर्षे झाली. दरम्यानच्या कालावधीत ती मुंबईला राहायला गेली. तिकडे ती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. तिला पोलिसांनी शोधून काढल्यानंतर चौकशी केली असता तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला विचारपूस केली. दोन वर्षांपूर्वी नागपुरातील मित्राने बलात्कार केल्याचे तिने मुंबई पोलिसांना सांगितले. त्यामुळे कामोठे पोलिसांनी हे प्रकरण मानकापूर पोलिसांकडे पाठविले. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Seven-year-old girl raped in Imamwada in Nagpur