बार्टीचे सात विद्यार्थी केंद्राच्या असिस्टंट कमांडंट पदी

By आनंद डेकाटे | Updated: June 18, 2025 17:39 IST2025-06-18T17:38:29+5:302025-06-18T17:39:01+5:30

Nagpur : भुवनेश कांबळे, श्रेयस बसर्गे, निखील वसईकर, हिमांशू मून, अनिकेत ठमके, श्रीनाथ सातपुते, रोहित मोगले यांचा समावेश

Seven students of Barty appointed as assistant commandants of the center | बार्टीचे सात विद्यार्थी केंद्राच्या असिस्टंट कमांडंट पदी

Seven students of Barty appointed as assistant commandants of the center

आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीतर्फे घेण्यात येत असलेल्या युपीएससी नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व चाचणी आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल २०२४ साठी बार्टीच्या सात विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडंट पदी निवड करण्यात आली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत त्यांचे हैद्राबाद येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी प्रशिक्षण सुरु होणार आहे.

बार्टीच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये भुवनेश कांबळे ( रॅंक १९४), श्रेयस बसर्गे (रॅंक २७५), निखील वसईकर (रॅंक ३२७), हिमांशू मून ( रॅंक ३६२), अनिकेत ठमके ( रॅंक ३९०), श्रीनाथ सातपुते (रॅंक) ४००, रोहित मोगले (रॅंक ४१२) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत बार्टीमुळे असिस्टंट कमांडंट बनण्याचे स्वप्न साकार झाल्याचे मनोगत व्यक्त केले.

संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) भरतीसाठी (असिस्टंट कमांडंट) परीक्षा आयोजित करते. सीएपीएफ हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पोलीस संघटनांचे सामूहिक नाव आहे. या दलांमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचा समावेश होतो. या दलांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे.

युपीएससीद्वारा आयोजित केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षेमार्फत सीएपीएफ मध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाते. बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यु.पी.एस.सी.-नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजने अंतर्गत पुर्व तसेच मुख्य परीक्षेचे प्रशिक्षणासह व्यक्तिमत्त्व चाचणी प्रशिक्षण दिल्या जाते. प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, मोफत प्रशिक्षण, प्रवास भत्ता दिल्या जातो.
 

Web Title: Seven students of Barty appointed as assistant commandants of the center

टॅग्स :nagpurनागपूर