शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 8:25 PM

सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली.

ठळक मुद्देअटींचे पालन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली.हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी केलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ आॅक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे तसेच विविध अटी निश्चित करून दिल्या आहेत. त्यामुळे हनीसिंगने वरील तीन देशांत जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.अर्जावर न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, हनीसिंगला सध्या केवळ थायलंडला जाण्याची परवानगी दिली. तसेच, थायलंडमधील वास्तव्यादरम्यान संबंधित अटींचे काटेकोर पालन करण्याचा व थायलंड दौऱ्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पाचपावली पोलीस ठाण्यात सादर करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने हनीसिंगचा २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचा थायलंड दौरा मंजूर केला आहे. तो थायलंडवरून भारतात परत आल्याची माहिती ६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाला कळविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, दुबई व ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी हनीसिंगला बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे व अ‍ॅड. आशिष किल्लेदार, तक्रारकर्ते जब्बल यांच्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय