शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

हा माणुसकीचा सेवाभाव!

By admin | Updated: October 23, 2016 02:51 IST

एखादा दिव्यांग जेव्हा शिबिरातून ‘जयपूर फूट’ घालून स्वत:च्या पायाने चालत जातो, तेव्हा मन प्रसन्न होते.

नारायण व्यास : १५ लाख रुग्णांना साहित्य वाटप नागपूर : एखादा दिव्यांग जेव्हा शिबिरातून ‘जयपूर फूट’ घालून स्वत:च्या पायाने चालत जातो, तेव्हा मन प्रसन्न होते. कामाचे समाधान मिळते. तो दिव्यांग आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असल्याचा मनात भाव निर्माण होतो आणि माणुसकीच्या सेवाभावाचा पाझर फुटतो, अशा भावना भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे नारायण व्यास यांनी व्यक्त केल्या. जयपूर येथील या भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद व नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने मागील १४ आॅक्टोबरपासून यशवंत स्टेडियम येथे दिव्यांगांना ‘जयपूर फूट’ आणि साहित्य वाटप शिबिर सुरू आहे. व्यास या संपूर्ण शिबिराची धुरा सांभाळत असून, यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला. १९७५ मध्ये स्थापन झालेल्या या समितीने मागील ४१ वर्षांत तब्बल १५ लाख ३४ हजार ७८४ दिव्यांगांना आपल्या पायावर उभे केले आहे. सध्या या समितीच्या देशभरात एकूण २७ शाखा कार्यरत असून, त्या प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांना नि:शुल्क ‘जयपूर फूट’सह इतर आवश्यक साहित्य दिल्या जाते. एवढेच नव्हे, तर त्याला स्वत:च्या पायावर उभे केल्यानंतर स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगाराची साधने सुद्धा भेट दिली जातात. समितीच्यावतीने आतापर्यंत वेगवेगळ्या २७ देशांत शिबिरे घेतली आहेत. ‘जयपूर’ येथे समितीचे रिसर्च सेंटर असून, येथे नवनवीन संशोधन केल्या जाते. या संस्थेची स्थापना ही जयपूर येथे झाल्याने कृत्रिम पायाला ‘जयपूर फूट’ असे नाव मिळाले. विशेष म्हणजे, ‘जयपूर फूट’ हा पूर्णत: ‘मेड इन इंडिया’ असून, तो जगभरात प्रसिद्ध आहे. समितीचे संस्थापक डी. आर. मेहता व अनिवासी भारतीय प्रेम भंडारी यांच्या विशेष प्रयत्नाने नागपुरातील शिबिर यशस्वी होत आहे. या शिबिरासाठी एचएसबीसी बँकेने विशेष निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही यावेळी व्यास यांनी आवर्जून सांगितले.(प्रतिनिधी)