हाडामासाचे तुकडे मिळाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 00:25 IST2021-02-20T00:23:46+5:302021-02-20T00:25:26+5:30
Human body pieces found गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाडामासाचे तुकडे मिळाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी डॉक्टर आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टसना घटनास्थळी बोलवून घेत ते मानवी शरीराचे आहेत की प्राण्याचे त्याची चौकशी चालविली आहे.

हाडामासाचे तुकडे मिळाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाडामासाचे तुकडे मिळाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी डॉक्टर आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टसना घटनास्थळी बोलवून घेत ते मानवी शरीराचे आहेत की प्राण्याचे त्याची चौकशी चालविली आहे.
गिट्टीखदान परिसरात रामदेवबाबा कॉलेजजवळ मैदान आहे. मैदानाजवळ पाण्याची टाकी आहे. या टाकीजवळ (शीलानगरकडून येणाऱ्या मार्गावरच्या टेकड्यावर) हाडामासाचे तुकडे पडून असल्याची माहिती काहींनी गिट्टीखदान पोलिसांना कळविली. त्यावरून गिट्टीखदानचे पोलीस तेथे पोहचले. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. सर्वत्र दुर्गंध सुटली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तेथेच डॉक्टर आणि फॉरेन्सिक एक्सपर्टसना बोलवून घेतले. त्यानंतर ते मेडिकल आणि लॅबमध्ये पाठविण्यात आले. ते हाडामासाचे तुकडे माणसाच्या शरीराचे की प्राण्याचे आहेत याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले.