शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनासह काेळसा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील जयस्तंभ चाैकात गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कारवाई करीत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील जयस्तंभ चाैकात गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कारवाई करीत काेळशाची चाेरटी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

देवनाथ प्रकाश वाडीभस्मे (३०, रा. रायनगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. ताे एमएच-३१/सीएन-७०४१ क्रमांकाच्या छाेट्या मालवाहू वाहनात काेळसा घेऊन जात हाेता. संशय आल्याने पाेलिसांनी त्याचे वाहन कामठी शहरातील जयस्तंभ चाैकात थांबवून झडती घेतली. त्यात काेळसा आढळून येताच त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात वाहनातील काेळशाची वाहतूक ही विना परवानगी केली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी सखाेल चाैकशी केली. त्यात ताे काेळसा चाेरीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी वाहनचालक देवनाथ वाडीभस्मे यास अटक केली.

त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे वाहन आणि सात हजार रुपये किमतीचा काेळसा असा एकूण १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, सहायक फाैजदार विनायक आसतकर, वीरेंद्र खोब्रागडे, मनोहर राऊत, नीलेश यादव, ललित शेंडे यांच्या पथकाने केली.