शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उकेंची तीन एकर जमीन जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:28 IST

वादग्रस्त वकील सतीश उके यांची दाभा येथे तीन एकर जमीन असल्याची माहिती शासनाने बुधवारी

हायकोर्टाचा आदेश : मालकीची शहानिशा करण्याची सूचना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वादग्रस्त वकील सतीश उके यांची दाभा येथे तीन एकर जमीन असल्याची माहिती शासनाने बुधवारी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही जमीन मालकीची शहानिशा करून तीन दिवसांत जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शासनाने वरील माहितीसह उके यांना शोधण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न व पुढील रणनीती याबाबतचे दस्तावेजही सादर केले. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाने उके यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास, अशी शिक्षा सुनावली. परंतु, उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. उके यांना पकडून गजाआड करण्यासाठी वॉरंट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणावर आता १० आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल. शासनातर्फे अ‍ॅड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली. काकड यांच्याविरुद्धची नोटीस मागे मुंबई येथील नोटरी अ‍ॅड. आर. एस. काकड यांनी उके यांचे दोन अर्ज अधिकृत केले होते. न्यायालयाने त्यावर आक्षेप घेऊन काकड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. काकड यांनी बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची बिनशर्त क्षमा मागितली. त्यामुळे न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस मागे घेतली. तसेच, अर्ज अधिकृत करून घेताना उके यांनी शिक्षेची माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची काकड यांना मुभा दिली.