शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

नागपूर जिल्ह्यातील भिवापुर बसस्थानकावर विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:56 PM

भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात.

ठळक मुद्देपोलीस तक्रारींचा अभाववाहनचालक, वाहकांसह टवाळखोरांचा जाच

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. ते सायंकाळी घरी परत जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत बसस्थानक परिसरात उभे असतात. त्यातच खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात. या गंभीर प्रकारांबाबत पालक पोलिसांत तक्रारी दाखल करीत नसल्याने टवाळखोरांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भिवापूर येथे तालुक्यातील तसेच लगतच्या चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील किमान ३०० विद्यार्थी - विद्यार्थिनी रोज शाळा - महाविद्यालयांमध्ये येतात. सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी बसने प्रवास करतात. भिवापुरातील बसस्थानक केवळ नावालाच आहे. त्यामुळे या विद्यार्थी - विद्यार्थिनींना रोज नागपूर - गडचिरोली महामार्गाच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. सायंकाळी या ठिकाणी विद्यार्थी - विद्यार्थिनींची चांगलीच गर्दी असते. त्यात इतर प्रवाशांची भर पडते. या मार्गावर नियमित धावणाऱ्या खासगी वाहनांचे चालक, वाहक तसेच शहरातील व बाहेरचे टवाळखोर विकृत इशारे, अश्लिल शिवीगाळ करीत विद्यार्थिनींना त्रास द्यायला सुरुवात करतात. दोन शालेय विद्यार्थिनी गुरुवारी (दि. २२) सायंकाळी भिवापुरातील बसस्थानक परिसरात उभ्या होत्या. त्यातच तीन तरुणांनी दोघांनीही पाणीपुरी खाण्याच्या निमित्ताने बोलावले. घाबरलेल्या विद्यार्थिनी वेळीच सावध झाल्या आणि त्यांनी हा प्रकार एका दुकानदाराला सांगितला. दुकानदाराने त्या तरुणांना हटकले असता तरुणांनी दुकानदारावरच हात उगारला. त्यामुळे दुकानदाराने पोलिसांची मदत घेतली. परिणामी, दोघांनीही पळ काढला.पुढे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत ठाण्यात आणले. विद्यार्थिनींकडून त्यांची ओळखपरेड करवून घेतली. शिवाय, विद्यार्थिनींचे पालकही ठाण्यात दाखल झाले. मात्र, त्यांनी तक्रार नोंदविण्यास असमर्थता दर्शविली. ठाणेदार हर्षल येकरे यांनी विद्यार्थिनी व पालकांना विश्वासात घेत तक्रार करण्याची विनंती केली. परंतु, पालकांनी तक्रार नोंदविली नाही. असेच प्रकार यापूर्वीही घडले आहे. दिवसेंदिवस असल्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने एकीकडे, टवाळखोरांची हिंमत वाढत असून, दुसरीकडे विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण होत आहे. ही बाब निकोप समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

बसचालकास चोप५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. बस बरीच उशिरा आल्याने चढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. त्यातच चालकाने बस सुरू करून पुढे नेली. त्यामुळे एक विद्यार्थिनी रोडवर पडली. या प्रकारामुळे विद्यार्थी चिडले आणि त्यांनी बसचालकास प्रसाद द्यायला सुरुवात केली. दरम्यान, प्रवाशांनी मध्यस्थी करून बसचालकास सोडविले.

पालकांमध्ये भीतीभिवापूरच्या बसस्थानक परिसरात रोज सायंकाळी ५.१५ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करीत उभे असतात. या काळात विद्यार्थिनींना नको ते अनुभव येतात. या प्रकाराबाबत बहुतांश विद्यार्थिनी भीतीपोटी पालकांना काहीही सांगत नाही. सांगितल्यास पालकाही त्याकडे गांभीर्याने बघत पोलिसांत तक्रार दाखल करत नाही. पोलिसांत तक्रार दाखल केल्यास समाजात आपली व मुलीची बदनामी होईल किंवा टवाळखोर वचपा काढतील, अशी भीती पालकांच्या मनात आहे. तक्रारीअभावी पोलिसांनाही टवाळखोरांविद्ध ठोस कारवाई करता येत नाही.

छोट्या विद्यार्थ्यांचे हालतालुक्यातील तास, जवराबोडी, नक्षी, मांगली, मेढा, तातोली, जवळी येथील छोटे विद्यार्थी रोज आॅटोने भिवापूर येथील खासगी कॉन्व्हेंटमध्ये येतात. कमी वेळ, डिझेलची बचत व अधिक कमाई या हव्यासापोटी आॅटोचालक या चिमुकल्यांना आॅटोमध्ये गुरांप्रमाणे कोंबतात. मागील वर्षी आॅटो उलटून काही छोटे विद्यार्थी जखमी झाले होते. हा अनुभव असतानाही या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केली नाही. हा प्रकार पालक व शाळा व्यवस्थापनाला माहिती असूनही कुणीही गांभीर्याने घेत नाही. हे आॅटो ना शाळेचे आहे ना शासनाचे. मग यांना विद्यार्थ्यांची ने - आण करण्याची परवानगी दिली कुणी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :Crimeगुन्हा