एफसीआय गोदामात दोन ट्रकमध्ये चिरडून सुरक्षारक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 20:06 IST2022-08-26T20:06:28+5:302022-08-26T20:06:54+5:30
Nagpur News एफसीआयच्या (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या गोदाम परिसरात दोन ट्रकच्या मध्ये चिरडून सुरक्षारक्षक ठार झाल्याची घटना घडली.

एफसीआय गोदामात दोन ट्रकमध्ये चिरडून सुरक्षारक्षक ठार
नागपूर : एफसीआयच्या (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या गोदाम परिसरात दोन ट्रकच्या मध्ये चिरडून सुरक्षारक्षक ठार झाल्याची घटना घडली. अविनाश शेंडे (३५, सुगतनगर) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
शेंडे हे दुपारच्या सुमारास ड्युटीवर होते. एफसीआयमध्ये ट्रकचे वजन मोजले जाते. एमएच ४० वाय ०९९१ या ट्रकचे वजन मोजण्याची प्रक्रिया सुरू होती. वजन काट्यावर ट्रक पुढे नेण्यासाठी ट्रकचालकाला सूचना देण्यात आली. मात्र, त्याने ट्रक मागे घेतला. ट्रकच्या मागे शेंडे उभे होते. त्याच्या मागे आणखी एक ट्रक उभा होता. दोन्ही ट्रकच्या मध्ये ते दबले गेले व गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून धंतोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.