नागपुरात २८ नोव्हेंबर पासून सचिवालयाचे कामकाज; हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा घेतला आढावा

By आनंद डेकाटे | Updated: November 14, 2025 18:48 IST2025-11-14T18:47:34+5:302025-11-14T18:48:13+5:30

Nagpur : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी. विधानमंडळ सचिवालयाचे कामाकज येत्या २८ नोव्हेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे.

Secretariat operations in Nagpur from November 28; Review of preparations for winter session taken | नागपुरात २८ नोव्हेंबर पासून सचिवालयाचे कामकाज; हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा घेतला आढावा

Secretariat operations in Nagpur from November 28; Review of preparations for winter session taken

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी. विधानमंडळ सचिवालयाचे कामाकज येत्या २८ नोव्हेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. त्यादृष्टीने निवास व कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामे तातडीने पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांनी शुक्रवारी दिल्यात.

विधानभवन येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधानमंडळ सचिव डॉ. विलास आठवले व शिवदर्शन साठ्ये यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आला, त्याप्रसंगी आठवले बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त बी. वैष्णवी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत तसेच विधानमंडळाचे उपसचिव रवींद्र जगदाळे, विजय कोमटवार, अजय सरवनकर, निलेश वडनेरकर, कक्ष अधिकारी कैलास पाझारे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशनानिमित्त रविभवन, नागभवन, आमदार निवास आदी ठिकाणी पीठासीन अधिकारी तसेच इतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात येते. निवास व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने कामे पूर्ण करावी अशी सूचना करण्यात आली.

प्रारंभी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत निवास, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहन व्यवस्था आदीसंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली.

मुख्य प्रतोद यांना मंत्रीपदाचा दर्जा

मुख्य प्रतोद व प्रतोद यांना मंत्री व राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयासाठी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

महिला आमदारांना पहिली विंग

आमदार निवास येथे महिला सदस्यांसाठी पहिल्या इमारतीमधील पहिला व दुसरा माळा (विंग)उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अधिकारी-कर्मचारी २० तारखेपासून येणार

सचिवालयचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असले तरी मुंबईवरून साहित्य व विधिमंडळाचे काही अधिकारी व कर्मचारी हे २० तारखेपासून नागपूर येथे रुजू होतील. त्यामुळे त्यांना आवश्यक वाहन व निवासाच्या सुविधा पूर्ण कराव्यात.

या सुविधा उपलब्ध करण्याबाबतचे निर्देश

  • हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास, विधान भवन, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी बसची व्यवस्था करण्यात यावी.
  • रेल्वे स्थानकातील वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची अडथळा येऊ नये.
  • आमदार निवास व विधानभवन येथे हिरकणी कक्षाची तयारी करण्यात यावी.
  • विधानभवनातील मंत्र्यांच्या कार्यालयांसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी.
  • विधानसभा आणि विधान परिषदेत अधिवेशनादरम्यान विद्युत व दूरध्वनी सुविधांची व्यवस्था करण्यात यावी.
  • नागपूरला येणारे लोकप्रतिनिधी व नागरिकांसाठीही आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी.

Web Title : नागपुर सचिवालय 28 नवंबर से शुरू; शीतकालीन सत्र की तैयारी की समीक्षा

Web Summary : नागपुर शीतकालीन सत्र के लिए तैयारी कर रहा है, सचिवालय 28 नवंबर को खुलेगा। अधिकारी आवास और कार्यालय व्यवस्था सुनिश्चित कर रहे हैं। महिला विधायकों और मंत्रियों के लिए सुविधाएं, परिवहन और संचार अवसंरचना स्थापित करने के प्रमुख निर्देश शामिल हैं।

Web Title : Nagpur Secretariat to Function from Nov 28; Winter Session Prep Reviewed

Web Summary : Nagpur is preparing for the winter session, with the secretariat opening November 28. Officials are ensuring accommodation and office arrangements are ready. Key directives include setting up facilities for female legislators and ministers, plus transportation and communication infrastructure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.