स्कुटी स्लिप झाली, गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: July 17, 2024 15:31 IST2024-07-17T15:30:11+5:302024-07-17T15:31:58+5:30
Nagpur : घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली

Scooty slips, seriously injured dies during treatment
नागपूर : स्कुटी स्लिप झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडगाव रोडवर आनंद पॅलेस ॲंड रेस्टॉरंटसमोर सोमवारी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास घडली.
जयकुमार सुभोदयाल जवाडे (५०, रा. दाभा, गिट्टीखदान) हे आपली स्कुटी क्रमांक एम. एच. ४०, बी. डब्ल्यू-९४०५ ने लाव्हाकडून सोनबानगरकडे येत होते. अचानक त्यांची स्कुटी स्लिप झाल्यामुळे ते खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उपचारासाठी वाडी येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी प्रीती जयकुमार जवाडे (३८) यांनी दिलेल्या सुचनेवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.