शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा विखुरल्याने शेतकऱ्यांना भाज्या विकताना होतोय आर्थिक तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:39 IST

भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराला शहराच्या विविध भागात विभागले. त्यानुसार शहरातील बाजारांमध्ये व्यापारी आणि अडतिया व्यवसाय करीत आहेत. पण या विखुरलेल्या बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागत आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर स्थिती सुधारणार : यंदा भाज्यांची जास्त आवक

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराला शहराच्या विविध भागात विभागले. त्यानुसार शहरातील बाजारांमध्ये व्यापारी आणि अडतिया व्यवसाय करीत आहेत. पण या विखुरलेल्या बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागत आहे.विहीरगाव येथील उत्पादक शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, कळमन्यात एक दिवसाआड भाज्या विक्रीसाठी नेत होतो. पण ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार बंद झाला आणि आम्हाला फटका बसला. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ठरलेल्या अडतियाकडे माल विक्रीसाठी नेताना दिवसभर मालाच्या विक्रीसाठी वाट पाहावी लागते. एवढेच नव्हे तर माल जागेवर खाली करण्याचे आदेश असतानाही अडतिया माल खाली करीत नाही, शिवाय मालाचे पैसेही वेळेत मिळत नाही.यंदा पावसाने मध्यंतरी हजेरी लावल्याने भाज्यांचे जास्त उत्पादन झाले. सर्वांच्या शेतात जास्त माल आहे. दररोज कापणी करून विकला नाही तर शेतातच खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात माल नेत आहे. घरी परतीच्या घाईने माल विकून मोकळे व्हावे लागत आहे. बाजारात नेणारा माल चांगल्या किमतीत विकला जावा, या अपेक्षेने बाजारात जातो. पण सध्या सर्व शेतकऱ्यांकडून मालाची आवक वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी पैसे घेऊन घरी परतावे लागत असल्याचे आंबटकर यांनी सांगितले.कॉटन मार्केटच्या अडतियांनी सांगितले की, येथील ३९ अडतिया आता आठ बाजारात व्यवसाय करीत आहेत. एका अडतियाला शेतकऱ्यांचा दोनच गाड्यांमधील भाजीपाला विकण्याची परवानगी आहे, शिवाय गाड्यांमधील भाज्या रिक्त करून भाज्या विकाव्या लागतात. अटी आणि नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागतो. याकरिता शेतकरी तोडणी केलेला पूर्ण भाजीपाला बाजारात आणत नाहीत. कोरोनामुळे सर्वच आर्थिक गणित बिघडले आहे. अडतियांसोबत शेतकऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. कळमना आणि कॉटन मार्केट या मुख्य बाजारात पूर्ण क्षमतेने भाज्या विक्रीसाठी आल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी