नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:18 IST2025-05-31T18:16:55+5:302025-05-31T18:18:05+5:30

२१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पिग्मी एजंट, वसुली अधिकाऱ्यांना दिल्या नियमबाह्य रकमा

Scam exposed at Utthan Credit Society in Nagpur! Misappropriation of Rs 4.54 crore in 5 years | नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार

Scam exposed at Utthan Credit Society in Nagpur! Misappropriation of Rs 4.54 crore in 5 years

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जरीपटक्यातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या २१ पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेची आणि ठेवीदारांची ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून जरीपटका पोलिसांनी संस्थेच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


शशिकांत नारनवरे (व्यवस्थापक), महेंद्र जनार्दन राऊत (अध्यक्ष), संजय दशरथ गजघाटे (उपाध्यक्ष), रवींद्र धर्मदास मेश्राम (संचालक), दुर्योधन डहारे, भगवा विठुजी नन्नावरे, गौतम दौलत गेडाम, राजेश पुरुषोत्तम मांजरे, नरेंद्र नामदेव शेंडे, अचल मनुराज रामटेके, मिलिंद नामदेव लांजेवार, प्रमोद देवदास वासनिक, प्रवण रामचंद्र मेश्राम, संजय माणिक जयस्वाल, विरंशकुमार वरखेडे, मनोज भीमराव गजभिये, छाया मधुकर मेश्राम (संचालिका), संगीता संजय थुल, नंदिनी अजयकुमार गौतम, स्वीकृत को ऑप. संचालक नरेश सोमकुंवर आणि प्रदीप मेश्राम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.


२८ मे २०२५ रोजी नारायण भुपतराव गाधेकर (५७, रा. श्री दत्तप्रसाद बंग्लो, नाशिक, ह. मु, गणेशपेठ पोलिस ठाणे समोर) हे विशेष लेखा परीक्षक वर्ग-२ म्हणून सहकारी संस्था, नागपूर येथे कार्यरत आहेत. गाधेकर यांनी जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उत्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इंदोरा या सहकारी पतसंस्थेचे एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ असे ५ वर्षाचे लेखा परीक्षण केले असता आरोपींनी संगनमताने कट रचून, ठेवीदाराच्या नियमबाह्य ठेवी स्वीकारून त्या ठेवी परत केल्या नाहीत. तसेच, खोट आर्थिक पत्रके तयार करून ते खरे असल्याचे भासवून शासनास सादर केले.


लेखा परीक्षणात झाले निष्पन्न
शासनाची, जनतेची व ठेवीदारांची दिशाभूल करून आरोपींनी ठेवीदारांच्या पैशाचा दुरुपयोग केला. तसेच बेकायदेशीर खर्च करून पिग्मी एजंट यांना बेकायदेशीर कमिशन व वसुली अधिकाऱ्यांना नियमबाह्य रक्कमा दिल्याचे लेखा परीक्षणात आढळले. यात आरोपींनी पतसंस्था व ठेवीदारांची एकूण ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गाधेकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पतसंस्थेच्या २१ पदाधिका-यांविरुद्ध कलम ४०६, ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४७१, ८७७ (अ), १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Scam exposed at Utthan Credit Society in Nagpur! Misappropriation of Rs 4.54 crore in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.