एसबीएल कंपनी स्फोट; मृत्यूचे सत्र सुरूच, दोन महिलांनी जीव गमावला

By सुमेध वाघमार | Updated: March 8, 2026 17:19 IST2026-03-08T17:18:43+5:302026-03-08T17:19:31+5:30

यातील काही रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. 

SBL company explosion death toll continues two women lost their lives | एसबीएल कंपनी स्फोट; मृत्यूचे सत्र सुरूच, दोन महिलांनी जीव गमावला

एसबीएल कंपनी स्फोट; मृत्यूचे सत्र सुरूच, दोन महिलांनी जीव गमावला

सुमेध वाघमारे,  नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, सध्याच्या स्थितीत आॅरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे १४ महिला उपचार घेत आहेत. एक आठवडा होऊनही यातील काही रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. 

आम्रपाली कालसर्पे (३६) यांचा उपचारादरम्यान ७ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्या ५५ टक्के जळल्या होत्या. त्या पहिल्या दिवसापासून व्हेंटिलेटरवर होत्या. तर, तर रोशनी सुर्यकांत उमाठे (३२) यांचा ८ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. त्या ७५ टक्के जळाल्या होत्या. त्यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर होते, पायावरवर शस्त्रक्रिया करून 'एक्सटर्नल फिक्सेशन' करण्यात आले होते. सध्या गंभीर रुग्णांमध्ये सुजाता  विनायक रक्षीत (३५) व सीमा विजय धुर्वे (२७ वर्षे) दोन्ही ७० टक्के, ज्योती शामू धुर्वे (२१ वर्षे) ६५ टक्के जळाल्या असून या  तीन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. 

-मृत्यूशी झूंज सुरूच

सध्या आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दुर्गा मनोज घाटगे ६० टक्के, उषा बालाजी रेवतकर ५० टक्के, मयुरी धुर्वे ४५ टक्के, मनीषा धुर्वे ४५ टक्के, काजल कोरती व रितू सलाम प्रत्येकी ४० टक्के, कविता उईके ३५ टक्के, सुनीता उईके ३० टक्के आणि वैशाली धुर्वे १५ टक्के जळाल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अल्प जखमीमध्ये वैशाली सटई आणि रोशनी मसराम असून दोन्ही ५ टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Web Title : एसबीएल कंपनी विस्फोट: मौतों का सिलसिला जारी; दो महिलाओं की मौत

Web Summary : एसबीएल कंपनी विस्फोट में मरने वालों की संख्या बढ़कर 22 हुई। दो और घायल महिलाओं ने दम तोड़ा। राउलगव में दुखद घटना के एक सप्ताह बाद चौदह अस्पताल में भर्ती हैं, जिनमें से कुछ की हालत गंभीर है।

Web Title : SBL Company Blast: Fatalities Continue; Two Women Dead

Web Summary : The SBL company blast death toll rises to 22. Two more injured women succumbed to their burns. Fourteen remain hospitalized, some in critical condition, a week after the tragic incident in Raulgav.

टॅग्स :nagpurनागपूर