शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सतीश गोगुलवार यांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:37 AM

कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे.येत्या २२ मार्चला होणाऱ्या ‘आरोग्य आणि मानवी हक्क’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा आठवा पुरस्कार आहे. डॉ. राम बुटले, डॉ. राम जाधव आणि संदीप तुंडूरवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली.डॉ. व्ही. एम. पेशवे हे यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयामधून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. संशोधन आणि मानवाधिकार हे त्यांच्या अध्यापनाचे क्षेत्र होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थी वर्गाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा नागपुरात ‘आरोग्य आणि मानवी हक्क’ या विषयावर संस्थेच्या वतीने आणि यशोदा गर्ल्स कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून परिषद होत आहे. यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक