शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

सतिश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 8:53 PM

माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन काँग्रेस पक्षाने रद्द केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी यांचे निलंबनकाँग्रेस पक्षाने रद्द केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. चतुर्वेदींच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.मनपा निवडणुकांदरम्यान चतुर्वेदी व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात तिकीट वाटपावरून तणाव निर्माण झाला होता. चव्हाण यांच्याविरोधात माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मोर्चाच उघडला होता. शहर काँग्रेसमध्ये माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे तसेच चतुर्वेदी-राऊत यांचे वेगवेगळे गट निर्माण झाले होते. पक्षाविरोधात केलेल्या कारवायांसाठी पक्षाने चतुर्वेदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचे उत्तर न दिल्याने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी दिल्लीदेखील गाठली होती. थोरात प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर चतुर्वेदी यांची घरवापसी होईल, असे कयास लावण्यात येत होते. त्यातच चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर बुधवारी निलंबन रद्द झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निलंबनानंतरदेखील मी काँग्रेसचाच कार्यकर्ता होतो. पक्षाच्या विचारधारेपासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही, अशी भावना चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Satish Chaturvediसतीश चतुर्वेदीcongressकाँग्रेसsuspensionनिलंबन