शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

समृद्धी महामार्ग आणखी १० महिने रखडणार; डाेंगराळ भागामुळे ठाणे जिल्ह्यातील कामात अडसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 05:23 IST

संपूर्ण एक्स्प्रेस वे मार्च २०२४ पूर्वी पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीवर दबाव आहे. या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहितेमुळे औपचारिक उद्घाटन शक्य होणार नाही. 

- आशिष रॉयलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. तथापि, ही अंतिम मुदत चुकण्याची शक्यता आहे. आमने (भिवंडी आणि कल्याणजवळील शेवटचा बिंदू)पर्यंतचाच मार्ग  मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण एक्स्प्रेस वे मार्च २०२४ पूर्वी पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीवर दबाव आहे. या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहितेमुळे औपचारिक उद्घाटन शक्य होणार नाही. नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटरचा महामार्ग सध्या खुला आहे. शुक्रवारी शिर्डी ते भरवीरदरम्यानचा आणखी ८० किमीचा मार्ग खुला होईल. जुलैअखेरपर्यंत पिंपरी सदरोद्दीन (इगतपुरीजवळ, भरवीरपासून आणखी २० किमी) पर्यंत काम पूर्ण होण्याची एमएसआरडीसीला आशा आहे.  वाशाळा बुद्रुक (ता. शहापूर, जि. ठाणे) पर्यंत मार्ग खुला होण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. डोंगराळ भूभागामुळे या भागावर पॅकेज १४ बांधकाम करणे आव्हानात्मक होते. वाशाळा बुद्रुक ते आमणे दरम्यानच्या शेवटच्या ६५ किमीच्या अंतरासाठी काही अवधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. डोंगराळ भूभाग आणि आणि रस्ता सह्याद्रीच्या डोंगरातून खाली येत असल्याने येथे अडचणी निर्माण होत आहेत.

अंतिम मुदत वाढलेली नाही  वाशाळा बुद्रुक ते आमणेदरम्यानचा भाग दोन पॅकेजमध्ये विभागला गेला.   पॅकेज १५ हे वाशाळा बुद्रुक ते बिरवाडी (२८ किमी) आणि पॅकेज १६ हे बिरवाडी ते आमणे (३७ किमी) आहे.   २०२०च्या उत्तरार्धात या पॅकेजवर काम सुरू झाले.   आमणेपर्यंत महामार्ग पूर्ण करण्याबाबत एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव म्हणाले की,  मार्च २०२४ पर्यंत अंतिम मुदत वाढलेली नाही.   महामंडळ तो डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग