शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

समोसे, चहाचा ‘एक्स-रे’

By admin | Updated: January 8, 2016 03:43 IST

एक्स-रे फिल्मवर प्रक्रिया करणाऱ्या ‘डार्क रुम’मध्ये चहा, नाश्त्याचे पदार्थ तयार केले जात आहे,

‘डार्क रुम’ चे झाले किचन : सुपर स्पेशालिटीतील अजब प्रकारसुमेध वाघमारे नागपूरएक्स-रे फिल्मवर प्रक्रिया करणाऱ्या ‘डार्क रुम’मध्ये चहा, नाश्त्याचे पदार्थ तयार केले जात आहे, तर लाखो रुपये किमतीच्या एक्स-रे मशीनच्या सानिध्यात चहा-समोस्यांचा आस्वाद घेतला जात आहे. जागोजागी खाद्यपदार्थांचे सामान आणि निघालेल्या कचऱ्याचा ढीग पडून दुर्गंधी सुटली आहे. हा प्रकार, ग्रामीण भागातील रुग्णालयातील नव्हे तर उपराजधानीतील चक्क सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आहे. धक्कादायक म्हणजे, या कॅन्टीनमधून रुग्णालय प्रशासनाला एक रुपयाही मिळत नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) हृदय शल्यचिकित्सा, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी या सात विभागातून रुग्णसेवा दिली जाते. गेल्या पाच वर्षात बाह्यरुग्ण विभागासोबतच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५ हजार ५१२ रुग्ण भरती होते. गेल्या वर्षी १ हजार ५५१ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या ७ हजार ६३ वर गेली आहे. रुग्णालयात रोज पंधरावर एन्जीओग्राफी, पाचवर एन्जीओप्लॅस्टी, दोन हृदयशल्यक्रियासह दोन न्युरो सर्जरी होतात. या शिवाय सर्वच वॉर्डाच्या खाटा गंभीर रुग्णाने फुल्ल असतात. रुग्णालयात विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेशातून रुग्ण येतात. येथील रुग्णसेवा अद्यावत करण्यासाठी रुग्णालय प्रशासन नवनवीन उपाययोजना करीत असल्याचेही चित्र आहे. असे असताना रुग्णालयाच्या आतील कॅन्टीनकडे अद्यापही कोणाचेच लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘कंडम’ची मंजुरी न मिळताच कॅन्टीन झाले सुरूसुपर स्पेशालिटीच्या क्ष-किरण विभागात १९९६ मध्ये पहिल्यांदा एक्स-रे मशीन लागली. २०१३ मध्ये पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून या विभागाला नवीन एक्स-रे मशीन मिळाली. शासकीय नियामानुसार कालबाह्य झालेली मशीन कंडम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे संबंधित विभागाने एक्स-रे मशीन कंडम करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही. मात्र, मेडिकल प्रशासनाने मंजुरीची प्रतीक्षा न करताच ही जागा कॅन्टीन मालकाला दिली. कॅन्टीनचा त्रास असूनही तक्रार नाहीविविध आजाराने कण्हत असलेल्या रुग्णांच्या गर्दीच्या ठिकाणीच या चहा-नाश्त्याचे कॅन्टीन आहे. या कॅन्टीनला मेडिकल प्रशासनाने मंजुरी दिली असलीतरी कॅन्टीन मालक कुठलेच नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. एक्स-रे विभागाच्या समोर असलेल्या या कॅन्टीनने नोंदणी कक्षाचीही बरीच जागा बळकावली आहे. याचा त्रास रुग्णांसह डॉक्टरांनाही होत आहे. मात्र, या विरोधात कोणीच तक्रार किंवा बोलत नसल्याचे चित्र आहे.जागा, पाणी, वीज सर्वच मोफत‘इंडियन टी हाऊस’ नावाने असलेल्या या कॅन्टीनवर रुग्णालय प्रशासन चांगलेच मेहरबान असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, नियमानुसार शासकीय जागेचा वापर करण्यासाठी निविदा व इतर प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतु येथे ही प्रक्रिया तर दूरच कॅन्टीनला जागा, पाणी आणि वीजही मोफत दिली जात असल्याची माहिती आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.