शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

साई प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

By admin | Updated: July 12, 2014 02:24 IST

राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) विदर्भातील खेळाडूंसाठी मायेचा हात दिला आहे. नागपुरात बास्केटबॉल आणि हॅण्डबॉल या खेळाचे प्रशिक्षण उद्या शनिवारपासून उपलब्ध होणार आहे.

नागपूर: राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) विदर्भातील खेळाडूंसाठी मायेचा हात दिला आहे. नागपुरात बास्केटबॉल आणि हॅण्डबॉल या खेळाचे प्रशिक्षण उद्या शनिवारपासून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी साईने रातुम नागपूर विद्यापीठाचे सहकार्य घेतले असून दोन्ही खेळांचे प्रशिक्षण विद्यापीठ क्रीडांगण परिसरात होईल. या आशयाचे आदेश साईकडून विद्यापीठाला प्राप्त झाले.या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे संचालक तसेच नागपूरचे माजी आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉलपटू रूपकुमार नायडू म्हणाले,‘सध्या दोन खेळ सुरू करीत आहोत पण दोन- तीन महिन्यात बॅडमिंटन आणि अ‍ॅथ्लेटिक्सची देखील प्रशिक्षण कार्यक्रमात भर पडेल. भविष्यात किमान १२ खेळांचे प्रशिक्षण येथे व्हावे हे माझे स्वप्न आहे.’ते पुढे म्हणाले,‘प्रशिक्षणात हॅण्डबॉलसाठी १३ मुले आणि १३ मुली तर बास्केटबॉलसाठी प्रत्येकी १६ मुले आणि मुलींची निवड करण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी आहे. गांधीनगर येथील साई केंद्राअंतर्गत कामकाज चालेल. रातुम नागपूर विद्यापीठ त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल तर साईद्वारे तज्ज्ञ प्रशिक्षक आणि खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनाची व्यवस्था केली जाईल. प्रशिक्षणासह प्रत्येक खेळाडूला चार हजार रुपये किमतीची किट, स्पर्धांसाठी दोन हजार रुपये आणि सहा हजार रुपये भत्ता दिला जाईल. याशिवाय वार्षिक १५० रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे.’शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पंकज देशमुख हे बास्केटबॉल तर नितीन गुजर हे हॅण्डबॉल प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी उपस्थित असलेले विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे चेअरमन डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,‘साई केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना विद्यापीठाला प्राप्त होतील, अशी आशा आहे. यानिमित्ताने विद्यापीठाद्वारे सिंथेटिक ट्रॅक उभारणी आणि अन्य सुविधा वाढविण्याची शक्यता तपासण्यात येईल.’ यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. धनंजय वेळूकर आदी उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)