शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

साहिलने केली होती बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 9:20 PM

नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांनंतर प्रकरण उघडकीस : नंदनवन ठाण्यात प्रकरणाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट घेतल्यानंतर नंदनवनपोलिसांकडून साहिलला अटक केली जाणार आहे. साहिलच्या विरोधातील हे सहावे प्रकरण आहे.नंदनवन निवासी अविनाश रारगोडे यांचे वडील श्यामराव यांचे रमणा मारोती येथे दोन हजार चौ.फुटाचे भूखंड होते. या जागेचे वर्तमान मूल्य एक कोटी रुपये इतके आहे. रघुवीर शर्मा नावाच्या व्यक्तीने श्यामराव रारगोडे यांच्या नावाचे बनावट मृत्यूपत्र बनवून हा भूखंड आपल्या नावे केला आणि नंतर साहिलला विकला. ही बाब कळताच अविनाश रारगोडे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपासास सुरुवातही केली. तथाकथित रघुवीर शर्मा याचा कधीच पत्ता लागला नाही. मात्र, पोलिसांकडून साहिलची कधीच विचारपूस झाली नाही. त्यानंतर पोलिसांनी रघुवीर शर्मा सापडत नसल्याचे सांगत न्यायालयाकडे आरोपपत्र पाठविण्यात आले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयातच प्रलंबित होते. २०१९ मध्ये अविनाश रारगोडे यांनी न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यासाठी आवेदन केले. याच आधारावर न्यायालयाने नंदनवन पोलिसांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहे.नंदनवन पोलिसांनी केलेल्या तपासात साहिलने हा भूखंड परवेज नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी औद्योगिक कर्मचारी गृह निर्माण संस्थेची बनवाट एनओसीही घेतली होती. याच आधारावर साहिलला या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले आहे. न्यायालयाने पुन्हा तपासाचे आदेश दिल्यानंतर आणि नंदनवन पोलीस या प्रकरणात गंभीर झाल्याने साहिलचे कारनामे पुढे यायला लागले आहेत. या प्रकरणात तत्कालीन तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नंदनवन पोलिसांनी आज प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केले असून, गुरुवारी त्याला तुरुंगातून अटक केली जाईल.अ‍ॅलेक्सिस प्रकरणात नीलिमाला अटकसाहिलची पत्नी नीलिमा जायस्वाल ऊर्फ तिवारीलासुद्धा अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटल प्रकरणात तुरुंगातून अटक करण्यात आली आहे. तिला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले जाईल. या प्रकरणाशी जुळलेल्या लोकांची नजर मनपाच्या अधिकाऱ्यावर खिळली आहे. याच अधिकाऱ्याची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. कोट्यवधी रुपये उकळण्यासाठीच हा प्रकार घडविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच या प्रकरणात हप्ता वसुलीचा गुन्हाही नोंद केला आहे. अशास्थितीत पोलीस मनपा अधिकाऱ्याबाबत कोणते पाऊल उचलतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी