सफेलकरचा साथीदार कटारियाला न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 22:56 IST2021-05-05T22:55:21+5:302021-05-05T22:56:31+5:30
Safalkar's accomplice slapped by court फसवणूक, ठार मारण्याची धमकी, खंडणी इत्यादी गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र ऊर्फ जितू प्रतापराय कटारिया याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला.

सफेलकरचा साथीदार कटारियाला न्यायालयाचा दणका
सफेलकरचा साथीदार कटारियाला न्यायालयाचा दणका
नागपूर : फसवणूक, ठार मारण्याची धमकी, खंडणी इत्यादी गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र ऊर्फ जितू प्रतापराय कटारिया याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. कटारिया हा कुख्यात गुन्हेगार रणजित सफेलकरचा साथीदार आहे. ८ एप्रिल २०२१ रोजी जुनी कामठी पोलिसांनी भीलगाव येथील डुम्मन प्रगट यांच्या तक्रारीवरून सफेलकर, कटारिया व इतर आरोपींविरुध्द एफआयआर नोंदवला आहे़ कटारियाला ९ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे़ आरोपींनी संगनमत करून प्रगट यांची मालमत्ता हडप केली़ तसेच, मालमत्ता परत करण्यासाठी त्यांना ५० लाख रुपये खंडणी मागितली व ठार मारण्याची धमकी दिली, अशी पोलीस तक्रार आहे़ सरकारच्या वतीने अॅड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले़