रसेल वायपर बसला होता चपलेत ठाण मांडून; सुदैवाने नजरेस पडल्याने वाचला जीव
By आनंद डेकाटे | Updated: September 15, 2025 20:11 IST2025-09-15T20:10:43+5:302025-09-15T20:11:12+5:30
चिचभवन रोडवरील जयंती नगरी-३ मधील घटना : अनर्थ टळला!

Russell Viper was sitting in a shoe; luckily he was saved by being spotted
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : "साप कधी कुठे दिसेल सांगता येत नाही" याची प्रचिती आली चिचभवन रोडवरील जयंती नगरी-३ येथील रहिवासी नवनीत अमराते यांना. जेव्हा त्यांनी दररोजप्रमाणे चप्पल घालण्यासाठी हात लावला आणि चक्क चप्पलच्या आत जहाल विषारी घोणस साप (रसेल वायपर) विसावलेला दिसला !
सुदैवाने, नवनीत यांना वेळीच साप नजरेस पडल्याने संभाव्य दुर्घटना टळली. कॉलनीत काही क्षणांसाठी खळबळ माजली. घटनास्थळी लगेच हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे सर्पमित्र आशिष राहेकवाड आणि सचिन झोड़े दाखल झाले. त्यांनी सुमारे दीड फूट लांबीचा घोणस साप सुरक्षितपणे रेस्क्यू करून निसर्गात सोडून दिला.
शरीरात रक्तस्त्राव होऊ शकतो, शरीरावर सूजन येते, हृदय आणि किडन्यांचे कार्य बिघडू शकते, त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात, बरेचदा हाताला अथवा पायाला सर्पदंश झाल्यास, वेळेवर उपचार न झाल्यास हात अथवा पाय गमवावा लागतों जीव जाण्याचा धोका असतो.
साप कधी कुठ ठाण मांडून बसेल याचा काही नेम नाही, सध्या झुडपी क्षेत्रालगतच्या वस्तीत, मोकाट प्लॉट असलेल्या भागात तसेच दिवसेंदिवस वाढत्या कांक्रीटी-करन होत असलेल्या क्षेत्रात साप निघन्याचे प्रमाण अधिक आहे, साप शिकार मिळवण्यासाठी देखील बरेचदा लोकांच्या घरात कंपाउंड मध्ये शिरल्याचे बघायला मिळत आहे.
घोणस सापाबद्दल थोडक्यात माहिती
वैज्ञानिक नाव : रसेल वायपर
वर्ग : वाइपरडी कुळ
विषप्रकार: हिमोटॉक्सिक (रक्तावर परिणाम करणारे)
वैशिष्ट्ये: त्रिकोणी डोके, पिवळसर रंगावर रुद्राक्षासारखे ठिपके
धोकाः रक्तस्त्राव, सूज, हृदय व किडनी निकामी होण्याचा धोका
या सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (संशोधित २०२३) अंतर्गत शेड्यूल-१ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून याला मारणे
कायद्याने गुन्हा आहे.
- सावध राहा, काळजी घ्या
- शूज, चप्पल वापरण्यापूर्वी तपासणी करा
- घराबाहेर झाडाझुडपं आणि ओला कचरा जमा होऊ देऊ नका
- रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करा
- सर्पमित्रांचे हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवा