शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रुपचंदानी कुटुंबिय पहलगाममध्ये सुखरूप, नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला

By नरेश डोंगरे | Updated: April 23, 2025 02:43 IST

तुम्ही काळजी करू नका, असे सांगून पहलगाम हल्ल्याचे साक्षीदार ठरलेल्या नागपूरकर रुपचंदानी कुटुंबियांनी त्यांच्या येथील नातेवाईकांना आश्वस्त केले...

नागपूर : पहलगाम हल्ल्याचे वेळी घटनास्थळी असलेले नागपुरातील रुपचंदानी कुटुंबीय सुखरूप आहे. मात्र, हल्ला झाल्याचे माहिती पडल्यापासून तो त्यांच्याशी संपर्क होईपर्यंतच्या दोन-तीन तासापर्यंत रुपचंदानी यांच्या नातेवाईकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला  होता. अखेर त्यांच्याशी संपर्क झाला अन् आम्ही सुखरूप आहोत... तुम्ही काळजी करू नका, असे सांगून पहलगाम हल्ल्याचे साक्षीदार ठरलेल्या नागपूरकर रुपचंदानी कुटुंबियांनी त्यांच्या येथील नातेवाईकांना आश्वस्त केले.जरीपटक्यातील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणारे रुपचंदानी कुटंबीय व्यापारी असून, गांधीबागमध्ये त्यांचे प्लास्टिकचे दुकान आहे. येथून ते १४ एप्रिलला दोन आठवड्याच्या काश्मिर टूरवर गेले होते. २७ एप्रिलला ते नागपुरात परत येणार होते. मात्र, आज पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर त्यात रुपचंदानी परिवारसुद्धा जखमी झाल्याचे वृत्त नागपुरात आले आणि जरीपटका सिंधी कॉलनीत भितीचे वातावरण निर्माण झाले. येथून त्यांच्या नातेवाईकांनी हालचाल जाणून घेण्यासाठी संपर्क करणे सुरू केले. मात्र, बराच वेळपर्यंत त्यांच्याशी संपर्कच होत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांमध्ये रडारड सुरू झाली. दरम्यान, रात्री ९च्या दरम्यान अखेर सिमरन रुपचंदानी यांच्याशी संपर्कही झाला. हल्ल्यानंतर निर्मांण झालेल्या धावपळीत पायाला दुखापत झाली. दुसरे काहीही नाही आम्ही तिघेही सुखरूप आहोत, असे सिमरनने त्यांच्या स्थानिक नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर आमचा जीव भांड्यात पडल्याची प्रतिक्रिया सिमरन यांचे नातेवाईक उमेश रुपचंदानी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. यासंबंधाने अधिक बोलणे झाले नाही. त्यामुळे आम्हाला फारसे काही सांगता येणार नसल्याचे उमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादnagpurनागपूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला