शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 10:16 PM

Zilla Parishad elections , Supreme Court वाढते कोरोना संक्रमण व ग्रामीण भागातील शेतीची कामे लक्षात घेता जिल्हा परिषदेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशा विनंतीसह माजी सदस्य ज्योती शिरसकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्दे ज्योती शिरसकर यांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढते कोरोना संक्रमण व ग्रामीण भागातील शेतीची कामे लक्षात घेता जिल्हा परिषदेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशा विनंतीसह माजी सदस्य ज्योती शिरसकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय अजय खानविलकर व संजीव खन्ना यांच्या पीठासमक्ष सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी २९ जून रोजी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १९ जुलै रोजी मतदान होणार असून उमेदवारांना ६ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. परंतु, वर्तमान परिस्थिती लक्षात घेता ही निवडणूक घेणे नागरिकांसाठी धोकादायक ठरेल असा दावा अर्जात करण्यात आला आहे.

गेल्या ३० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या विनंतीवरून ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्याची परवानगी दिली होती. राज्य सरकारने कोरोना संक्रमनाचा धोका लक्षात घेता ही विनंती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ७ जूनपासून ५-लेवल अनलॉक योजना जाहीर केली. त्यानुसार अकोला, धुळे, नंदूरबार, नागपूर व वाशीम जिल्हा लेव्हल-१ मध्ये असल्यामुळे येथील जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आली. लेव्हल-३ मधील पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक थांबवण्यात आली. दरम्यान, डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा धोका पाहता नागपूर जिल्ह्याचा लेवल-३ मध्ये समावेश करण्यात आला आहे. परिणामी, जिल्हा परिषदेचे निवडणूक घेण्याचा निर्णय अवैध आहे. याशिवाय ही निवडणूक ग्रामीण भागाशी संबंधित असून सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मतदार शेतकरी व्यस्त आहेत. करिता, ही निवडणूक तीन महिने पुढे ढकलणे आवश्यक आहे असेही शिरसकर यांनी अर्जात म्हटले आहे. राज्य सरकारने २३ जून रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, आयोगाने २५ जून रोजी ती विनंती अमान्य केली याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले आहे. शिरसकर यांच्या वतीने ॲड. किशोर लांबट कामकाज पाहतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक