आरटीओ एजंट ऑफिस आगीत खाक
By मंगेश व्यवहारे | Updated: May 6, 2024 19:02 IST2024-05-06T19:00:55+5:302024-05-06T19:02:34+5:30
Nagpur : आगीत आरटीओ कार्यालय जळून खाक

RTO agent office burned
नागपूर : आरटीओ कार्यालयासमोरील प्रियदर्शिनी हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या आरटीओ एजंट ऑफिसला रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत आरटीओ कार्यालय जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल स्टेशनमधून अग्निशमन पथकाचे वाहन घटनास्थळी रवाना झाले.
या कार्यालयाच्या आजूबाजूला असलेला कचराही जळत असल्याने आगीचे लोट वाहताना दिसून आले. अग्निशमन पथकाच्या जवानांनी लगेच कार्यवाही करून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.