नागपूर विद्यापीठाची २९ जूनची परीक्षा ९ जुलै रोजी

By आनंद डेकाटे | Updated: June 27, 2023 17:06 IST2023-06-27T17:04:57+5:302023-06-27T17:06:00+5:30

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने काढली अधिसूचना

RTM Nagpur University exam on June 29 postponed to July 9 | नागपूर विद्यापीठाची २९ जूनची परीक्षा ९ जुलै रोजी

नागपूर विद्यापीठाची २९ जूनची परीक्षा ९ जुलै रोजी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून घेण्यात येणारी २९ जून रोजी ची लेखी परीक्षा रविवार ९ जुलै रोजी निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. परीक्षेच्या दिनांक झालेला बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे.

बकरी ईद (ईद उल झुआ) या सणामुळे गुरुवार २९ जून रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व लेखी परीक्षा रद्द करण्यात येत आहे. २९ जून होणाऱ्या दोन्ही वेळेतील परीक्षा रविवार ९ जुलै रोजी निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर होणार असल्याचे संबंधित प्राचार्य, केंद्रप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी यांना सूचित करण्यात आले आहे.

Web Title: RTM Nagpur University exam on June 29 postponed to July 9