शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

आरटीई घोटाळ्यातील आरोपींनी दिले होते बनावट रहिवासी पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:38 IST

सदर पोलिसांचा दावा : न्यायालयामध्ये १३ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर पोलिसांनी सोमवारी आरटीई प्रवेश घोटाळ्यातील १० आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये १३ हजार ४८ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींनी बनावट रहिवासी पुरावे तयार करून त्या आधारावर आरटीईच्या २५ टक्के राखीव कोट्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश पक्के केले होते, असा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये प्रशांत हेडाऊ, राजेश बुवाडे, राजा जमशेद शरीफ, रूपाली धगगाये ऊर्फ रुकसार सैयद, रोहित पिल्ले, शुभम चुटे, अनिल मेश्राम, मंगेश झोटिंग, प्रदीप भांगे व पल्लवी हेडाऊ यांचा समावेश आहे.

हा घोटाळा २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामधील आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी शाहीद जमशेद शरीफ हा फरार असून तो आरटीई प्रवेशाकरिता बनावट कागदपत्रे तयार करत होता. दरम्यान, तालुका पडताळणी समितीच्या चौकशीमध्ये आरोपी पालक प्रशांत हेडाऊने वेळाहरीतील पोद्दार शाळेत तर, राजेश बुवाडेने शंकरपूरमधील रॉयल गोंडवाना शाळेत बनावट रहिवासी पुरावा सादर केल्याचे आढळून आले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कवडू दुर्गे यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२, २०१, ३४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.

त्यानंतर घोटाळ्याच्या तपासाकरिता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे व इतरांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत.

इतर गुन्हेही उघडया घोटाळ्याच्या तपासादरम्यान शाहिद व राजाचे इतरही गुन्हे उघडकीस आले. आरोर्पीनी राहत्या घरात प्राणघातक शस्त्रे ठेवली होती. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तसेच, राजा व पिल्ले यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे आणि राजा व इतरांनी मध्यप्रदेश जंगलामध्ये वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे पुरावेही मिळाले. या प्रकरणांमध्येसुद्धा गुन्हे दाखल केले गेले आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर