शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 9:59 AM

कलम 370 हटवण्यासह गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले.

नागपूर -  कलम 370 हटवण्यासह गेल्या लर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. मोदी सरकारमध्ये साहसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे, अशी शाबासकीही भागवत यांनी दिली. तसेच इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचेही सरसंघचालकांनी कौतुक केले. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी तिने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले, असे सरसंघचालक म्हणाले. 

आज विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा नागपूरमधील रेशीमबाग येथे होत आहे. या मेळाव्यात उपस्थित स्वयंसेवकांना मोहन भागवत यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, ''मागील सरकारला परत निवडून आणून देशाच्या जनतेने त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला आहे. सोबतच येणाऱ्या काळासाठी अनेक अपेक्षादेखील व्यक्त केल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. देशाची सुरक्षेची स्थिती, सैन्यदलाची तयारी, शासनाचे सुरक्षा धोर व आंतरराष्ट्रीय राजकारणात दाखविलेली कुशलता यामुळे आज जनता आश्वस्त आहे. जनतेची परिपक्व बुद्धी व कृती, देशात जागृत झालेला स्वाभिमान, शासनाचा दृढसंकल्प व वैज्ञानिक सामर्थ्य यामुळे मागील वर्ष संस्मरणीय राहिले आहे.'' ''देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीमा प्रदेशात सुरक्षा रक्षक तसेच चौक्यांची संख्या वाढवावी लागेल. तसेच सागरी सीमेवरील बेटांच्या सुरक्षेत वाढ व्हायला हवी,'' असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन व्हावे कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा तसेच सत्तेवर असलेल्यांचे स्वागतच व्हायला हवे. आता ३७० च्या आडून न झालेली कामे पूर्ण होतील तेव्हाच हे पाऊल पूर्ण होईल, असे समजले जाईल. तेथून घालविण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले पाहिजे. तसेच काश्मीर खोºयात रोजगार निर्मितीदेखील व्हावी, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. समरसतेची स्थिती हवी तशी नाहीदरम्यान, सरसंघचालकांनी सामाजिक भेदभावावरदेखील भाष्य केले. समाजात एकात्मता, समता व समरसतेची स्थिती जशी हवी होती, तशी अद्याप नाही. याचा लाभ देशविरोधी तत्व घेतात. समाजात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, असेदेखील डॉ.भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370